बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘छावा’चाच बोलबाला, सलमानच्या ‘सिकंदर’कडून सपशेल निराशा?

On: April 8, 2025 8:56 AM
Chhaava Box Office Earns 612 Cr
---Advertisement---

Chhaava Box Office | विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शित होऊन 53 दिवस उलटले असतानाही बॉक्स ऑफिसवर आपली कमाई टिकवून ठेवली आहे. ‘सिकंदर’ आणि ‘जाट’सारख्या चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘छावा’चा जलवा कायम आहे. (Chhaava Box Office )

छावा 612 कोटींच्या पुढे?

‘छावा’ चित्रपटाने सात आठवड्यांत हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये मिळून एकूण 609.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 50व्या दिवशी 55 लाखांची कमाई झाल्यानंतर, 51व्या दिवशी 95 लाख, आणि 52व्या दिवशी 1.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात आला. 53व्या दिवशी सकाळी 10.45 वाजेपर्यंत मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ‘छावा’ने 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंतची एकूण कमाई 612.97 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे बदलू शकतात, मात्र या चित्रपटाचा कमाईचा वेग अद्याप मंदावलेला नाही, हे निश्चित.

या चित्रपटाने ‘स्त्री 2’ला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सातवे स्थान मिळवले आहे. विक्की कौशलच्या दमदार अभिनयासह चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत, आणि सादरीकरण यामुळे ‘छावा’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने त्याच्या 130 कोटींच्या बजेटच्या तुलनेत भरघोस नफा कमावला आहे.

‘सिकंदर’ची काय स्थिती?

सलमान खानच्या ‘सिकंदर’ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाही, त्यामुळे ‘छावा’ला काहीसे फायदेशीर ठरले. मात्र, आता सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याने ‘छावा’साठी संधी मर्यादित राहिली आहे. ‘जाट’ हा चित्रपट देशभरात मोठ्या प्रमाणावर रिलीज होणार असून, त्यामुळे ‘छावा’चे थिएटरमधील शो कमी होण्याची शक्यता आहे. (Chhaava Box Office )

सध्याच्या स्थितीत ‘छावा’कडे अजून फक्त तीन दिवसांचीच कमाईची संधी आहे. त्यानंतर प्रेक्षकांचे लक्ष ‘जाट’कडे वळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येणारे काही दिवस ‘छावा’साठी निर्णायक ठरणार आहेत.

Title : Chhaava Box Office Earns 612 Cr in 53 Days

Join WhatsApp Group

Join Now