Chhaava box office | बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर ‘छावा’ (Chhaava box office) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरूच ठेवली आहे. हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, त्याचा व्यवसायही वेगाने वाढत आहे. केवळ चार दिवसांत चित्रपटाने उत्पादन खर्च वसूल केला आणि आता मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहे. आता, प्रदर्शनाच्या 19 व्या दिवशी, ‘छावा’ने किती कमाई केली, हे जाणून घेऊया.
विक्की कौशलच्या ‘छावा’ची दमदार कमाई
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटातील विक्की कौशलच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्यासह इतर कलाकारांनी देखील आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. यामुळे ‘छावा’ प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात ‘छावा’ला मोठा फटका बसला असला, तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सुरुवातीच्या मोठ्या कमाईनंतर आता हा चित्रपट सिंगल डिजिटमध्ये कमाई करताना दिसत आहे. तरीदेखील, विक्की कौशलचा हा ऐतिहासिक चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांवर मात करताना दिसत आहे.
19 व्या दिवशी ‘छावा’नं कमावले 5.50 कोटी रुपये
‘छावा’ने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात त्याने 180.25 कोटी रुपये कमावले. 15 व्या दिवशी ‘छावा’ने 13 कोटी रुपये कमावले. 16 व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 22 कोटी रुपये होते. 17 व्या दिवशी 24.25 कोटी रुपयांची कमाई झाली. 18 व्या दिवशी 8.25 कोटी रुपये कमावले.
तर, 19 व्या दिवशी ‘छावा’ने 5.50 कोटी रुपयांची कमाई केली. यासह, या चित्रपटाचे 19 दिवसांत एकूण कलेक्शन 472 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 19 व्या दिवशी 5.50 कोटी रुपयांच्या कमाईसह तो सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ने ‘सुल्तान’ , गदर 2′ , ‘अॅनिमल’ या चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.
Title : Chhaava Box Office Day 19 Beats Animal






