…तर मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही

On: November 22, 2024 2:56 PM
Maratha Reservation Protest
---Advertisement---

Maharashtra l राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत. मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. मात्र आता 21 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडली आहे. अशातच आता उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. मात्र या निकालापूर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

जरांगे पाटील यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येणार नाही :

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, मतदान संपल्यावर सर्वच राजकीय पक्ष पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय राज्यात महायुतीचे नवीन सरकार आल्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषण करण्याची वेळ देखील येणार नाही असं ते म्हणाले आहेत.

कारण राज्यात महायुतीचे सरकार असल्यास ती परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे नवीन सरकार समोर मराठा आरक्षणाचा विषय प्राधान्यक्रमाने असणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत.

Maharashtra l चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? :

सत्ता स्थापनेसाठी महायुतीला जागा कमी पडणार नाहीत. कारण कमळ, धनुष्यमान आणि घड्याळ यांच्या एकत्रित मिळून 160 जागा निवडून येतील. मात्र त्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय हा दिल्लीमध्ये तिन्ही पक्षांच्या बैठकीत होणार आहे.

तसेच आमची संघटना ही शिस्तीत चालते आहे, त्यामुळे कशातच फूट पडली नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा दिल्लीतील नेत्यांवर देखील विश्वास आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एड्स महायुतीचे सरकार येणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

News Title – Chandrakant Patil statement on maratha aarkshan 

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील ‘हे’ मतदारसंघ ठरू शकतात जायंट किलर!

निकालापूर्वीच शरद पवार ॲक्शन मोडवर; उमेदवारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना?

विद्यार्थ्यांनो… दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये पुन्हा बदल?

सत्ता स्थापनेबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाले..

भाजपकडून अपक्षांना ‘इतक्या’ कोटींची ऑफर?; राजकारणात खळबळ

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now