‘मोदींनी गेले तीन महिने आराम केला नाही, त्यामुळेच…’; चंद्राबाबूंचं मोठं वक्तव्य

Chandrababu Naidu | भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरु असून NDA मधील सर्व पक्षांचे खासदार या बैठकीला हजर होते. यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

नरेंद्र मोदींनी गेले तीन महिने अजिबात आराम केला नाही. दिवस-रात्र त्याच उत्साहाने जोरदार प्रचार केसा. आंध्र प्रदेशात तीन जाहीर सभा घेतल्या, एक मोठी रॅली केली. त्यामुळे खूप मोठा फरक पडला आणि आंध्र प्रदेशात आम्ही जिंकलो. अनेक नेते आंध्र प्रदेशात आले केंद्र आपल्यासोबत आहे त्यामुळे हा आत्मविश्वास लोकांमध्ये आला आहे, असं चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) म्हणाले.

Chandrababu Naidu | चंद्राबाबूंचं मोठं वक्तव्य

नरेंद्र मोदींच्या रुपाने एनडीएकडे दूरदृष्टी असलेले नेत्यांचा पाठिंबा आहे. मागील गेल्या 40 वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय असून अनेक नेते बघितलेत. आज भारत जागतिक शक्ती बनला आहे. आज जगात भारताचा डंका जगभरात वाजतोय, त्याच सर्व श्रेय मी मोदींना देतो, असं म्हणत त्यांनी मोदींचे अभिनंदन केलं.

नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार स्थापन होत आहे. जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी मिळून नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित भाजपा आणि एनडीए नेते तसेच नवनिर्वाचित खासदारांना संबोधित केलं.

4 जूनला निकाल येत होते, तेव्हा मी कामात व्यस्त होतो. त्यावेळी मी कोणाला तरी विचारलं, आकडे वैगेरे ठीक आहेत. पण मला सांग, EVM जिवंत आहे की मेलं. कारण या लोकांनी आधीच ठरवलेलं भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, म्हणून ईव्हीएमला शिव्या घातल होते. पण 4 जूनच्या संध्याकाळी त्यांना टाळी लागली. EVM ने त्यांना शांत केलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांचा येत्या 9 जूनला म्हणजे रविवारी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?

मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

बीडमधील वातावरण तापलं; पंकजा मुंडेंविषयीच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ

एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले ‘ही माझी कमाई’