चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ

Chandrababu Naidu | आंध्रप्रदेशमध्ये पुन्हा एकदा टीडीपी सरकार स्थापन झालं आहे. आज (12 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये चौथ्यांदा एन चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह 23 मंत्री आहेत. टीडीपीचे 19, पवन कल्याणसह जनसेनेचे 3 आणि भाजपचा एक मंत्री आहे.

पवन कल्याण उपमुख्यमंत्रीपदी

शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आलिंगन देऊन चंद्राबाबू (Chandrababu Naidu) यांचं अभिनंदन केलं. विजयवाडाच्या गन्नावरम विमानतळाजवळ आयोजित सोहळ्यात नायडूंनी शपथ घेतली. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत टीडीपी, भाजपा आणि जनसेना या आघाडीने यश मिळवलंय.

एकूण 175 जागांपैकी 164 जागांवर या आघाडीने विजय मिळवला आहे. यात टीडीपीने 135, जनसेना 21 आणि भाजपाने 8 जागा जिंकल्या आहेत. टीडीपीच्या मंत्र्यांमध्ये 17 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नव्या सरकारमध्ये किती मंत्री?

यामध्ये जनसेना पक्षाकडे पवन कल्याण, नदेंदला मनोहर आणि कंदुला दुर्गेश हे तीन मंत्री असून सत्यकुमार यादव हे भाजपच्या कोट्यातील एकमेव मंत्री आहेत. यासोबतच मंत्रिमंडळात तीन महिला देखील आहेत. एन मोहम्मद फारुख यांच्या रूपाने एका मुस्लिम चेहऱ्याचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय.

यासोबतच चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचे पुत्र आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनाही मंत्रीपद मिळालं आहे. तसंच टीडीपी आंध्र प्रदेशचे अध्यक्ष के. अचन्नायडू आणि जनसेना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष नदेंदला मनोहर देखील मंत्रिमंडळात सामील आहेत.

News Title :  Chandrababu Naidu became CM of Andhra Pradesh

महत्त्वाच्या बातम्या-

थकवा, हातापायाला मुंग्या येतात?, असू शकते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता; करा ‘हा’ उपाय

“मोदी अहंकारी आहेत, ते मुस्लिमांचा द्वेष करत नाही हे त्यांनी पटवून द्यावं”

बुलढाण्यात मोठी दुर्घटना; वादळी वाऱ्यामुळे झोक्यात झोपलेली चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली

“भारतीयांनी आळशी होऊ नये, देश अजूनही..”; कंगना रनौतचं मोठं आवाहन

देशातील प्रथम महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा!