आयुष्यात यश मिळवायचं असेल तर ‘या’ सवयी आजच सोडा!

On: June 1, 2024 3:13 PM
Chanakya niti
---Advertisement---

Chanakya Niti | भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे आजही पाळली जातात. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.

चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.

चाणक्य यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा असं म्हटलं आहे. तसंच काही गोष्टी कायम लक्षात घ्याव्यात असं ते म्हणतात. चाणक्य यांच्या मते, या चार सवयींमुळे माणसाला जीवनात अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने या सवयी सोडल्या किंवा बदलल्या तर त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्या सवयी.

आळशी होऊ नका

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, जो माणूस आळशी असतो त्याला कधीच यश मिळत नाही. असा माणूस नेहमी उद्यापर्यंत आपले काम पुढे ढकलत राहतो, त्यामुळे त्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे तो नेहमी दुःखी राहतो.

कोणाशीही भेदभाव किंवा तुलना करू नका

ज्या व्यक्तीमध्ये भेदभावाची भावना असते तो कधीही आनंदी राहत नाही. जो व्यक्ती नेहमी तुलना करतो तो व्यक्ती कधीच समाधानी नसतो.नेहमी अधिकची इच्छा ठेवून, तो स्वतःला उध्वस्त करतो. (Chanakya Niti ) त्यामुळे कुणाशीच तुलना किंवा भेदभाव करू नये.

लोभ

जी व्यक्ती लोभी असते त्यांना (Chanakya Niti) कधीना कधी आपल्या लोभामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अती लोभापायी मनुष्य चुकीच्या मार्गावर जातो.अशा व्यक्ती आपला मान-सन्मान हरवून बसतात.त्यामुळे लोभ करू नये.

बेईमान

आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक नसतात त्यांना आयुष्यात कधीच यश मिळत नाही. असे लोक जीवनात कधीच पुढे जात नाहीत.अशा लोकांकडे नेहमीच पैशांची कमतरता असते.

News Title :  Chanakya niti for Success
महत्वाच्या बातम्या- 

अपघातानंतर पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवारांचा मोठा खुलासा

नताशाला 70 टक्के हिस्सा दिल्यावर हार्दिककडे काय उरणार?, एकूण संपत्ती किती?

गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ; मुकेश अंबानींना टाकलं मागे

अनंत-राधिकाच्या क्रूझ पार्टीत परदेशी कलाकार दाखवणार जलवा; सर्वाधिक मानधन कुणाला?

जून महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

Join WhatsApp Group

Join Now