Goverment Scheme | शासनाकडून नेहमीच महिलांसाठी नवनवीन उपक्रम आणि योजना राबवल्या जात असतात. महिलांनी पुढे येऊन आपले योगदान देशाच्या प्रगतीत देणे हे प्रत्येक जबाबदार समाजासाठी महत्त्वाचे आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, अस्मिता योजना किंवा मग ‘लाडकी बहीण योजना’ महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून राबवल्या जातात.
देशातील महिला शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरू :
अशातच देशातील महिला शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. शेती उत्पादन वाढवायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर शेती व्यवसायाला अधिक लाभदायक ठरवू शकतो. यामुळे हा शेती व्यवसाय सोपा होतो आणि उत्पादनही दुपटीने वाढते.
भारतात शेतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही. ट्रॅक्टरच्या वाढत्या किंमती बऱ्याच शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नसतात. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तर ट्रॅक्टर घेणे कसेच शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊनच ही योजना राबवण्यात येत आहे. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवण्यात येत आहे.
Goverment Scheme | ट्रॅक्टर खरेदीसाठी महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान :
SAMA (Sub-Mission on Agricultural Mechanization) ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याचा प्रावधान आहे. पुरुषांसाठी हे अनुदान 40 टक्के आहे.
याचाच अर्थ, जर ट्रॅक्टरची किंमत साडे पाच लाख असेल तर दोन लाख 75 हजार रुपये अनुदान महिलांना मिळणार आहे. तसेच अर्धी किंमत महिलांना भरावी लागेल.
इच्छुक शेतकऱ्यांनी काय करावे :
- ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी http://agrimachinery.in , http://agrimachinery.in किंवा http://myscheme.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा.
- अर्जात तुम्हाला तुमची माहिती, बँक खाते माहिती आणि काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात.
- अर्ज करण्यासाठी आधारकार्ड आणि बँक पासबुकची आवश्यकता असते.
News title : Central Goverment Tractor Scheme






