कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

On: September 19, 2024 12:32 PM
Indian Army Bharti
---Advertisement---

Job Updates l तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. कॅनरा बँकेने ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या बंपर पदांसाठी भरती सूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते आजपासून 2 दिवसांनी म्हणजेच 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करायचा :

कॅनरा बँकेच्या अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मात्र अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या canarabank.com या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे 3000 रिक्त पदे भरली जाणार आहे. तसेच अर्ज 21 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे.

कॅनरा बँक शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना अप्रेंटिसशिप पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. आधीच नोंदणीकृत असल्यास तुम्ही थेट बँकेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. मात्र तुम्ही आधीच नोंदणीकृत नसल्यास तुम्हाला http://www.nats.education.gov.in वर भेट देऊन प्रथम नोंदणी करावी लागेल. ज्या उमेदवारांची नोंदणी अप्रेंटिसशिप पोर्टलवर पूर्ण झाली आहे तेच उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Job Updates l अर्ज फी किती असणार? :

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच या भरतीसाठी 20 ते 28 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी उमेदवाराचा जन्म 1/9/1996 ते 1/9/2004 दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.

कॅनरा बँकेच्या शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागणार आहे. तसेच SC, ST, PH श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज शुल्काचा भरणा फक्त ऑनलाइन केला जाऊ शकतो. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले पेमेंट स्वीकारले जाणार नाही.

News Title : Canara Bank Apprentice Recruitment 2024

महत्वाच्या बातम्या –

अजितदादांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला

बँकेची काम आजच उरकून घ्या, सलग 4 दिवस बँका बंद राहणार

जोरदार उसळीनंतर सोनं पुन्हा झालं स्वस्त; सध्या काय आहेत किंमती?

ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार

आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now