‘अण्णाजी पंत’ म्हणणं मुख्यमंत्र्यांचा अपमानच! फडणवीसांच्या मदतीला शिंदे गटाचे नेते धावले

On: July 6, 2025 5:16 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईतल्या मराठी भाषेच्या समर्थनार्थ झालेल्या रॅलीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ‘अण्णाजी पंत’ अशा शब्दात संबोधलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे हिणवणं म्हणजे त्या पदाचा अपमान आहे.

राजकीय मतभेद वैचारिक असावेत, व्यक्तिगत पातळीवर जाऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “मुख्यमंत्र्यांची तुलना पेशव्यांशी केली असती तरी चाललं असतं, पण ‘अण्णाजी पंत’ म्हणणं हे योग्य नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

“यूज अँड थ्रो” ही उद्धव ठाकरेंची नीती – केसरकरांचा आरोप :

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी यावरही प्रतिक्रिया दिली. “दोन भाऊ एकत्र येणं ही चांगली गोष्ट असली तरी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी,” असं ते म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत म्हटलं, “मी स्वतः ‘यूज अँड थ्रो’ ही नीती अनुभवली आहे. नारायण राणेंच्या विरोधात मला वापरून नंतर दूर फेकलं.”

तसेच, त्यांनी स्पष्ट केलं की एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चालत आहेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जात काँग्रेससोबत हातमिळवणी केली, त्यामुळेच आमदारांनी त्यांच्यापासून दूर व्हायचं ठरवलं.

Devendra Fadnavis | “राज ठाकरेंची भूमिका लवकरच स्पष्ट होईल” :

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी ज्या विचारधारेपासून दूर गेलं, त्याच विचारधारेशी राज ठाकरे किती प्रामाणिक राहतात हे लवकरच कळेल.” (Devendra Fadnavis)

केसरकर यांनी शेवटी स्पष्ट केलं की, मूळ शिवसेना आणि कार्यकर्ते आजही आमच्यासोबत आहेत. “राज्यात कायद्याचं राज्य राहावं, आणि कोणतीही हिंसक घटना घडू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे,” असं ते म्हणाले.

News Title: Calling CM Devendra Fadnavis ‘Annaji Pant’ Is an Insult – Deepak Kesarkar Slams Uddhav Thackeray

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now