बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत आदिती तटकरेंच मोठं विधान! सर्व पक्षांना केलं आवाहन

On: April 6, 2026 5:12 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Aditi Tatkare | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करावा, असे आवाहन केले आहे. दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत ही निवडणूक होत असल्याने संवेदनशीलता जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (Baramati By-Election)

सुनेत्रा पवार यांना पाठिंब्याची विनंती :

आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, बारामतीची ओळख ही सर्व धर्म आणि समाजघटकांचा सन्मान करणाऱ्या परंपरेमुळे आहे. अशा ठिकाणी काही व्यक्तींनी केलेल्या वर्तनामुळे ही परंपरा धोक्यात येऊ नये, असे त्यांनी नमूद केले. सध्याचा काळ सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी अत्यंत भावनिक आणि कठीण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांनी संयम राखावा, अशी विनंती केली. (Baramati By-Election)

 

View this post on Instagram

 

A post shared by थोडक्यात (@thodkyaat)

त्यांनी पुढे सांगितले की, या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांना राजकीय स्पर्धेऐवजी सहकार्य आणि पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारे त्यांना त्रास होईल असे वातावरण निर्माण होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. बारामतीच्या सामाजिक संस्कृतीला साजेसे वातावरण राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Aditi Tatkare | अजितदादांच्या कार्याचा गौरव :

आदिती तटकरे यांनी भाषणात दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, ते सामान्य कार्यकर्त्यांशी जोडलेले आणि सर्व समाजघटकांशी समन्वय ठेवून काम करणारे नेते होते. त्यांनी जात-पात आणि धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन विकासासाठी काम केले, अशी आठवण त्यांनी व्यक्त केली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि महायुतीतील विविध नेते तसेच अनेक संघटनांनी सुनेत्रा पवार यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. काँग्रेस (Congress) आणि इतर राजकीय पक्षांशीही वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती देत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा आदर राखण्यासाठी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी नम्र विनंती सर्व पक्षांना केली.

News Title: Call for Unopposed Baramati By-Election

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now