दिल्ली हादरली! थेट संसद भवन आणि ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

On: February 9, 2026 7:11 PM
Delhi school threat
---Advertisement---

Delhi school threat | राजधानी दिल्ली (Delhi)मध्ये संसद (Parliament) आणि नऊ शाळांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी हा मेल प्राप्त होताच सुरक्षायंत्रणा सतर्क झाली असून संबंधित शाळा आणि संवेदनशील ठिकाणी तपासणी व बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

संसद व शाळांना लक्ष्य करणारा मेल :

मिळालेल्या ईमेलमध्ये 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी संसदेत मोठा स्फोट होईल, असा गंभीर मजकूर नमूद करण्यात आला आहे. याच मेलमध्ये दिल्लीतील नऊ शाळांमध्येही बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि पंजाबला खलिस्तान बनवण्याचा उल्लेख करण्यात आला असून, यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता अधिक वाढली आहे. (Delhi school threat)

हा मेल समोर येताच ज्या शाळांची नावे धमकीमध्ये नमूद होती, त्या सर्व शाळांमध्ये तातडीने खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शाळांच्या आवारात आणि परिसरात तपास सुरू असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.

Delhi school threat | शोधमोहीम व सुरक्षा यंत्रणा सतर्क :

दिल्ली फायर सर्व्हिस (Delhi Fire Service)ने सांगितले की, सोमवारी सकाळी शहरातील विविध भागांतील शाळांकडून आपत्कालीन कॉल प्राप्त झाले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडसह पथके घटनास्थळी पाठवण्यात आली. आतापर्यंत नऊ शाळांना धमकीचे मेल मिळाल्याची माहिती असून, सर्व ठिकाणी सखोल तपासणी सुरू आहे आणि संबंधित भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर विभागाच्या मदतीने मेलचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीतील सर्व संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. धमकी खरी आहे की अफवा, याचा तपास सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

News Title: Bomb Threat to Parliament and Schools

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now