Bollywood News | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘सेक्रेड गेम्स’मधील कुकू ही भूमिका साकारलेली कुब्रा सैत हिने आपल्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, लग्नाआधीच ती गर्भवती राहिली होती, मात्र परिस्थितीमुळे तिला एकटीनेच गर्भपात करावा लागला. त्या काळात ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कमजोर झाली होती. (Bollywood News)
“त्या वेळी मला कुठलीही ताकद जाणवत नव्हती”
कुब्रा सैतने एका मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा मी गर्भपात केला, तेव्हा मला अजिबात ताकद जाणवत नव्हती. मी खूप अशक्त झाले होते. त्या निर्णयामुळे मी आतून कोलमडले. मला पूर्णपणे रिकामं वाटत होतं. जर मी हे केलं नसतं, तर कसं जगू शकले असते?”
ती पुढे म्हणाली, “मी कोणालाही काही सांगितलं नाही आणि एकटीने रुग्णालयात जाऊन गर्भपात केला. लोकांच्या टोमण्यांची, सामाजिक दबावाची भीती वाटत होती. त्या क्षणी मला असं वाटलं की, मी काहीच कामाची नाही.”
“गर्भपात करताना मी पूर्णपणे एकटी होते”
कुब्रा पुढे सांगते, “मी समाजाने बनवलेले नियम मोडले आणि कोणालाही त्याची जाणीवसुद्धा होऊ दिली नाही. मी गर्भपात करण्यासाठी एकटीच गेली होते. मला त्या वेळी कुणाचाच आधार नव्हता.”
काही आठवड्यांनंतर तिची एक मैत्रीण भेटायला आली. ती नाराज होती की, कुब्रा सैत हल्ली कोणालाही वेळ देत नव्हती. त्या वेळी तिने मैत्रिणीला आपल्या गर्भपाताबद्दल सांगितले. (Bollywood News)
कुब्रा म्हणाली, “त्या वेळी मला हे कळलं नव्हतं की, याचा माझ्या संपूर्ण आयुष्यावर किती खोलवर परिणाम होईल. मला असं वाटत होतं, ‘मी मेले असते तर?’ हा काही छोटासा निर्णय नव्हता. मी पूर्णपणे एकटी होती आणि कुणालाही काहीही माहिती नव्हतं.”
Title : Bollywood News Kubra Sait Shocking Revelation about her abortion






