Bollywood Actress on Periods l मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. कारण हार्मोनल बदलांमुळे पाठ, पोट आणि कंबर यामध्ये प्रचंड वेदना होतात. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान महिलांना, मुलींना शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाणे देखील प्रचंड त्रासदायक ठरतं. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना खास सुट्टी द्यावी यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असल्याच दिसत आहे. अशातच बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनाही मासिक पाली दरम्यान प्रचंड त्रास होतो. त्यामुळे काही अभिनेत्रींचं मत आहे की मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळावी.
मला मासिक पाळी आली आहे हे बोलणं देखील सोप्पं व्हावं :
महिलांना मासिक पाळीदरम्यान प्रचंड त्रास होतो. मात्र त्या कालावधीत महिलांना सुट्टी मिळावी याबाबत अभिनेत्री आलिया भट्ट म्हणाली की, मासिक पाळीदरम्यान महिलांना मोठ्या प्रमाणात असह्य वेदना होत असतात. त्यामुळे महिलांना व मुलींना प्रीरियड्सच्या काळात सुट्टी देण्यात यावी. कारण आजकाल पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला काम करते आहे. त्यामुळे महिला कुठेही कमी पडत नसल्याने तिला त्या कालावधीत आरामासाठी सुट्टी देण्यात यावी असं आलिया म्हणाली आहे.
याशिवाय यासंदर्भात अभिनेत्री तापसी पन्नूने पीरियड्स लीव्हवर आपलं रोखठोक मत मांडलं आहे. पीरियड्स लीव्हचं समर्थन करत तापसी पन्नू म्हणाली की, पीरियड्स लीव्ह असणं मी अत्यंत सामान्य बाब आहे. तसेच माझी तब्येत ठीक नाही. याप्रमाणे मला पाळी आली आहे हे बोलणं देखील सोप्पं व्हावं. त्यामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळणं देखील महत्वाचं आहार.
Bollywood Actress on Periods l मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळणं गरजेचं :
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हीना खान ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयांवर आपलं रोखठोक मत मांडत असते. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी याबद्दल पोस्ट देखील लिहिली होती,”मला मासिक पाळी आल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत शूटिंग न करण्याचा ऑप्शन माझ्याकडे असता तर किती चांगलं झालं असतं. या दिवसांत प्रचंड वेदना होतात. तरी देखील बाहेर शूटिंग करावं लागते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान महिलांना नक्कीच सुट्टी मिळणं फार गरजेचं आहे.
याशिवाय छोट्या पडद्यावरील आणि अनेक घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मात्र मासिक पाळीवर तिने मतं मांडलं आहे. मासिक पाळीदरम्यान अभिनेत्रीला देखील खूप त्रास होतो. त्यामुळे त्या कालावधीत आराम करायला सुट्टी देण्यात यावी.
News Title – Bollywood Actress on Periods
महत्त्वाच्या बातम्या-
कॅशबॅकपासून बिल भरण्यापर्यंत, या 4 बँकांनी बदलले क्रेडिट कार्डचे नियम; काय परिणाम होणार?
जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या!, कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
या राशीच्या व्यक्तींनी आज भांडणात सहभाग घेऊ नका
..तर तुम्हीही ठरू शकता उष्माघाताचे बळी; ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
‘या’ तारखेपूर्वी आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करून घ्या; अन्यथा..






