मोठी बातमी! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग

On: April 21, 2024 5:15 PM
BJP Office Fire
---Advertisement---

BJP Office Fire | राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना मुंबईतून एक मोठी बातमी आली आहे. भाजपच्या मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयाला (BJP Office Fire) आग लागली आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळातच आग भडकली. त्यामुळे धूर आणि आगीचे लोट पसरले होते. अचानक आग लागल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली.

भाजपच्या कार्यालयाला भीषण आग

रविवारचा दिवस असल्याने मुंबईच्या कार्यालयात वेल्डिंगचं काम सुरू होतं. त्यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. भाजप कार्यालयाच्या (BJP Office Fire) मागच्या बाजूने ही आग लागली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पाहायला मिळाले. या कार्यालयामध्ये कुणीही व्यक्ती अडकला नसल्याची माहिती आहे.

BJP Office Fire | अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही वेळात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.

मुंबईतील हे प्रमुख कार्यालय (BJP Office Fire) आहे. दररोज या ठिकाणी राज्यभरातून अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कायम गर्दी असते. पण आज रविवार असल्याने या ठिकाणी कुणीही नव्हतं अशी माहिती आहे.

या कार्यालयात फक्त भाजपचं सोशल मीडियाचं काम चालतं. त्यामुळे निवडणुका असल्याने आजही सोशल मीडियाचं काम सुरू होतं. तेवढेच कर्मचारी ऑफिसमध्ये होते. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हातातील काम टाकून तात्काळ बाहेर धाव घेतली. सर्व कर्मचारी एका क्षणात ऑफिसच्या बाहेर पडले. त्यामुळे आगीत कोणीही अडकलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर उन्हामुळे होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

‘नवनीत राणांचा पती रवी राणामुळे…’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

एका मिनिटासाठी 1 कोटी मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री; आलिया, दीपिकालाही टाकलं मागे

पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांच्यावर मोठी कारवाई, भरावा लागणार ‘इतका’ दंड

तुम्हीही बनावट पनीर खात नाही ना?, ‘असं’ ओळखा असली आहे की नकली

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now