पराभव लागला जिव्हारी; आणखी एका भाजप नेत्याने दिला राजीनामा

On: June 6, 2024 12:22 PM
BJP Yuva Morcha
---Advertisement---

BJP | लोकसभा निवडणुकीचा निकाल हा नुकताच जाहीर झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीने कमाल केली आहे. सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीने मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीने 17 जागांवर राज्यात विजय मिळवला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या (BJP) जिव्हारी पराभव लागला असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता फडणवीस यांनी सत्तेतून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

भाजप आमदाराने पक्षसंघटनेचा राजीनामा दिला

फडणवीस यांनी सत्तेतून बाहेर पडत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं. मात्र अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप (BJP) आमदाराने पक्षसंघटनेचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर रामटेकमध्ये कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता भाजपच्या डोकेदुखीत वाढ होताना दिसत आहे.

भाजपचे (BJP) आमदार प्रवीण पोटे यांनी अमरावतीचे भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. प्रवीण पोटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. यामुळे आता अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव

तसेच रामटेकमध्ये कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजू पारवे यांना 18 हजार मतं कमी मिळाली होती. यामुळे भाजपने (BJP) कामठी मतदारसंघातील कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीला मतदारांनी विजयापासून रोखलं आहे. याचा परिणाम हा येत्या विधानसभा निवडणुकीवर होताना दिसणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सध्या इंडिया आघाडीच्या जागा एनडीएपेक्षा कमी असल्या तरीही केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार बसू शकतं अशी शक्यता आहे. ती शक्यता नाकारता येणार नाही. मात्र सरकार स्थापन करण्याची सर्वाधिक संधी ही एनडीएला असल्याचं बोललं जात आहे.

News Title – BJP Leader Pravin Pote Resign From His Party After Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; ‘इतके’ आमदार शरद पवारांकडे परतणार?

“माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी..”; निलेश लंकेंच्या आईच्या आरोपांनी खळबळ

चिन्हामुळे झाला घोळ; शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं कारण समोर

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ भागात पूरसदृश्य पाऊस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Join WhatsApp Group

Join Now