“भाजप नेत्यांची पबमध्ये…”; रवींद्र धंगेकरांच्या आरोपाने खळबळ

On: February 25, 2025 4:07 PM
Sameer Patil Vs Ravindra Dhangekar
---Advertisement---

Ravindra Dhangekar | पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत. “पुण्यात वाढती गुन्हेगारी आणि पब संस्कृती याला भाजपचे नेते जबाबदार आहेत,” असे सांगत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

“भाजप नेत्यांची पबमध्ये पार्टनरशिप, त्यामुळे गुन्हेगारी वाढली”

रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात गुन्हेगारी वाढण्यामागे “भाजप नेत्यांचे पब व्यवसायाशी संबंध आहेत,” असा गंभीर दावा केला आहे. ते म्हणाले, “भाजप नेत्यांची अनेक पबमध्ये भागीदारी आहे, त्यामुळे ते या व्यवसायांना अभय देतात. परिणामी, अशा ठिकाणी गुन्हेगारी वाढते आणि पोलिसांवर दबाव येतो.” तसेच गजानन मारणे टोळीवर दोन एफआयआर का?, असा सवाल देखील धंगेकर यांनी उपस्थित केला.

गजानन मारणे टोळीवर दोन एफआयआर दाखल करण्यात आले, असे काय घडले की दुसऱ्या एफआयआरमध्ये नवीन कलमे वाढवण्यात आली?, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या वादात मारणे बळी गेला का?, निवडणुकीत मारणे टोळीने कोणाचा प्रचार केला होता?, भाजपच्या कोणत्या गटाला जास्त मदत केली आणि कुणाला कमी? असे गंभीर प्रश्न धंगेकर यांनी केले आहेत.

खासदार मोहोळ यांच्यावरही साधला निशाणा 

दीपक मानकर (Deepak Mankar) निवडणुकीच्या काळात तुरुंगातून बाहेर येऊन थेट प्रचाराला लागले. ते कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आले? भाजप नेत्यांनीच निवडणुकीत या गुंडांचा वापर केला. आता तेच गुंड सर्वसामान्य पुणेकरांना त्रास देत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप खासदार मोहोळ यांच्यावरही निशाणा साधला. “जेव्हा सर्वसामान्य पुणेकरांना गुंड त्रास देतात, तेव्हा खासदार गप्प राहतात. मात्र, त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमधील कोणाला मारहाण झाली, की ते आक्रमक होतात,” असे ते म्हणाले.

“पुण्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली, सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे”, असं सांगत धंगेकर यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले, “पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का, हेही पाहणे गरजेचे आहे.”

Title : BJP Behind Punes Crime Rise Ravindra Dhangekar Shocking Allegations

 

Join WhatsApp Group

Join Now