‘बिग बॉस मराठी ७’ कास्टिंगबाबत मेकर्सची मोठी घोषणा; प्रेक्षकांना दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

On: July 9, 2026 12:48 PM
Bigg Boss Marathi 7
---Advertisement---

Bigg Boss Marathi 7 | ‘बिग बॉस मराठी 7’ (Bigg Boss Marathi ७) च्या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच शोच्या नावाखाली बनावट कास्टिंग, फसवे फॉर्म आणि पैशांची मागणी करणाऱ्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेकर्सनी अधिकृत सूचना जारी केली आहे. त्यामुळे चाहत्यांनी आणि इच्छुकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बनावट कास्टिंगपासून दूर राहण्याचे आवाहन :

‘कलर्स मराठी’ (Colors Marathi) व ‘बिग बॉस मराठी ७’ च्या नव्या सिझनबाबत उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सिझनमध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाल्यामुळे यंदा कोणत्या नव्या चेहऱ्यांना घरात प्रवेश मिळणार, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. आमंत्रणासाठी कॉल किंवा ई-मेल कोणाला येणार, याबाबतही अनेक जण प्रतीक्षा करत आहेत.

याच उत्सुकतेचा गैरफायदा घेत काही जण शोच्या नावाने बनावट कास्टिंग प्रक्रिया, खोटे फॉर्म आणि फसव्या ऑफर्स देत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मेकर्सनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सूचना प्रसिद्ध करून अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.

Bigg Boss Marathi ७ | अधिकृत प्लॅटफॉर्मवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन :

मेकर्सनी प्रसिद्ध केलेल्या सूचनापत्रात, “महत्त्वाची सूचना. ‘बिग बॉस मराठी ७’ च्या नावाखाली सुरू असणाऱ्या बनावट कास्टिंग प्रक्रिया, फॉर्म किंवा फसव्या दाव्यांपासून सावध राहा. अधिकृत माहितीसाठी फक्त आमच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरच विश्वास ठेवा. सतर्क रहा, सुरक्षित रहा,” असे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, शोच्या कास्टिंग प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा फॉर्म भरून घेतला जात नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कास्टिंग प्रक्रिया पूर्णपणे अधिकृत आणि गोपनीय पद्धतीने पार पडते. त्यामुळे कास्टिंगच्या नावाखाली पैसे मागणारी कोणतीही व्यक्ती, एजन्सी किंवा बनावट कॉल-मेसेज यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे मेकर्सनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रेक्षकांनी अशा फसवणुकीबाबत सतर्क राहून केवळ अधिकृत घोषणांचीच दखल घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

News title : Bigg Boss Marathi 7 Casting Warning

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now