लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे येणार?

On: January 18, 2026 1:01 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांमुळे हा हप्ता रखडला होता, मात्र आता आचारसंहिता संपल्याने सरकारकडून निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ( Maharashtra Women Scheme)

याआधी डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्याआधी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यात आला होता. सरकारने महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा केली होती, मात्र आचारसंहितेमुळे जानेवारीचा हप्ता रखडला.

आचारसंहितेमुळे थांबले पैसे :

राज्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही आर्थिक लाभ आधीच देण्यास बंदी घातली होती. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता मिळू शकला, तर जानेवारीचा हप्ता थांबवण्यात आला होता.

मात्र आता आचारसंहिता संपल्याने सरकारकडून हप्ता वितरणाची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहिता संपताच जानेवारीचा हप्ता देण्याचे सूचक विधान केले होते. त्यामुळे महिलांमध्ये आता खात्यात पैसे कधी जमा होणार याची उत्सुकता वाढली आहे.

Ladki Bahin Yojana | ५ फेब्रुवारीपूर्वी मिळण्याची शक्यता :

राज्यात फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार असून ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. त्याआधीच महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील १८ ते २० दिवसांत महिलांना त्यांच्या खात्यात १५०० रुपयांचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana News)

अद्याप सरकारकडून हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी प्रशासन पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत शासन आदेश जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर निधी वितरण प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.

News Title: Big Relief for Ladaki Bahin Beneficiaries After Municipal Elections, January Installment Likely Soon

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now