Match Fixing | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच एका दिग्गज क्रिकेटपटूवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले असून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, नुकताच टी-20 विश्वचषक संपला असून या स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद मिळवले. आता जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष आयपीएलकडे लागले असताना अचानक समोर आलेल्या या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वेस्टइंडिजच्या खेळाडूवर फिक्सिंगचे आरोप :
वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज जेवॉन सियर्ल्स (Javon Searles) याच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. International Cricket Council (ICC) ने त्याच्यावर अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.
२०२३-२४ मध्ये बार्बाडोस येथे आयोजित करण्यात आलेल्या Bim10 League या स्पर्धेदरम्यान हे प्रकरण घडल्याचा आरोप आहे. या स्पर्धेत खेळताना फिक्सिंगशी संबंधित संशयास्पद हालचाली केल्याचे समोर आले. या प्रकरणात सिअर्ल्ससह त्याच्या संघातील दोन अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवण्यात आले असून त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
Match Fixing | आयपीएलमध्येही खेळला आहे हा खेळाडू :
चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सिअर्ल्सला फिक्सिंगसाठी ऑफर मिळाल्याची माहिती होती, मात्र त्याने ती संबंधित अधिकाऱ्यांना दिली नाही. तसेच तपासादरम्यान अँटी करप्शन युनिटला सहकार्य न करता महत्त्वाची माहिती लपवली, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
३९ वर्षीय सिअर्ल्स याने पूर्वी Indian Premier League मध्येही खेळले आहे. २०१८ साली तो Kolkata Knight Riders या संघाकडून खेळला होता. त्या हंगामात त्याने तीन सामने खेळून दोन विकेट घेतल्या होत्या. आता या कारवाईनंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






