शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! दोन उमेदवार गजाआड; अटकेचे नेमकं कारण काय?

On: January 15, 2026 5:45 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केल्याने नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठी खळबळ उडाली आहे. ऐरोली परिसरात घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. (Shivsena candidates arrested)

निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उमेदवारांवर अटकेची कारवाई झाल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. मतदानाच्या दिवशीच उमेदवारांना पोलिस ताब्यात घेतल्याने मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐरोलीतील मारहाणी प्रकरणात पोलिसांची कारवाई :

नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोली सेक्टर १६ परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी रबाळे पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार एम. के. मढवी आणि त्यांचे सुपुत्र करण मढवी यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंडळातील काही तरुणांना मढवी कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Airoli assault case)

या प्रकरणात एम. के. मढवी, त्यांचा मुलगा करण मढवी आणि विनया मढवी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघेही सध्या निवडणूक रिंगणात आहेत. पोलिसांनी चौकशी करत दोघांना मतदानाच्या दिवशी ताब्यात घेतल्याने ही घटना अधिक चर्चेत आली आहे.

Eknath Shinde | तिघेही उमेदवार निवडणूक रिंगणात :

एम. के. मढवी हे प्रभाग क्रमांक ४-ड मधून निवडणूक लढवत आहेत, तर करण मढवी प्रभाग क्रमांक ५ मधून आणि विनया मढवी प्रभाग क्रमांक ५-ड मधून उमेदवार आहेत. एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांवर गुन्हा दाखल झाल्याने शिवसेना शिंदे गटासाठी ही बाब राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरत आहे. (Navi Mumbai Municipal Corporation Election 2026)

दरम्यान, नवी मुंबईतील नेरुळ परिसरात बोगस मतदानाचा प्रकारही समोर आला आहे. प्रभाग क्रमांक २३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी पाच जणांना पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी अशा घटनांमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

News Title : Big Blow to Eknath Shinde’s Shiv Sena as Two Candidates Arrested on Polling Day in Navi Mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now