भूषण प्रधानने सांगितला मनीष मल्होत्राच्या पार्टीतला अनुभव; म्हणाला ‘पार्टीत सर्वजण…’

On: February 24, 2025 4:41 PM
Bhushan Pradhan
---Advertisement---

Bhushan Pradhan l अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) सध्या त्याच्या व्यावसायिक कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो अभिनेत्री अनुषा दांडेकरला (Anusha Dandekar) डेट करत आहे. जरी त्यांनी अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केली नसली, तरी ते सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटादरम्यान अनुषा (Anusha Dandekar) आणि भूषणची (Bhushan Pradhan) जोडी जमली.

मनीष मल्होत्राच्या पार्टीला भूषणची हजेरी :

Anusha Dandekar (अनुषा दांडेकर) मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही सक्रिय असल्याने ती भूषणलाही (Bhushan Pradhan) अनेकदा सोबत घेऊन जाते. बॉलिवूडमधील (Bollywood) दिवाळी पार्ट्या खूप प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra) दिवाळी पार्टीला भूषणने (Bhushan Pradhan) हजेरी लावली होती, ज्यामुळे अनेक मराठी प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते.

भूषणने (Bhushan Pradhan) दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड (Bollywood) पार्टीतील अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “मी फार पार्ट्यांना जात नाही. अनुषाच्या (Anusha Dandekar) वाढदिवसाच्या पार्टीला आणि एकदा Manish Malhotra (मनीष मल्होत्राच्या) पार्टीला गेलो होतो. त्यातून ती इंडस्ट्री (Industry) जवळून पाहता आली.”

“बॉलिवूड (Bollywood) पार्ट्या वरवरच्या असतात, असे म्हणतात, पण कदाचित प्रत्येक पार्टी वेगळी असते. Manish Malhotra (मनीष मल्होत्राच्या) पार्टीत सर्वजण त्याच्यावर प्रेम करणारे होते. सगळे मजा-मस्ती करत होते. अनेक कलाकारांशी भेट झाली. त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली. अनुषाचे (Anusha Dandekar) आभार, कारण तिच्यामुळेच मला या पार्टीला जाता आले.” असेही तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, “मला सतत पार्टीला जायला आवडत नाही, घरी राहायला जास्त आवडते. मला वाटते घरी भेटून, गप्पा मारून खरी व्यक्ती कळते.”

Bhushan Pradhan l भूषण प्रधानचे चित्रपट :

भूषणच्या (Bhushan Pradhan) कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो गेल्या वर्षी ‘घरत गणपती’, ‘लग्न कल्लोळ’, ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. याशिवाय ‘तू तिथे असावे’, ‘रे राया’, ‘आम्ही दोघी’, ‘अजिंक्य’, ‘शिव्या’, ‘पारंबी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस मॅच’ या चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. त्याची ‘पिंजरा’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.

News Title: Bhushan Pradhan Shares Experience of Manish Malhotra’s Bollywood Party

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now