आज वर्षातील पहिले प्रदोष व्रत! महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ‘अशा’ प्रकारे करा पूजा

On: March 11, 2025 8:59 AM
Bhaum Pradosh Vrat 2025
---Advertisement---

Bhaum Pradosh Vrat 2025 |  हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत दर महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते.

जर हे व्रत मंगळवारी आले, तर त्याला भौम प्रदोष व्रत म्हणतात. हे व्रत मंगळ ग्रहाशी संबंधित दोष कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. (Bhaum Pradosh Vrat 2025)

भौम प्रदोष व्रताचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

या वर्षी मार्च महिन्यातील पहिले प्रदोष व्रत आज म्हणजेच 11  मार्च 2025 रोजी आहे. पंचांगानुसार, फाल्गुन शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 11 मार्च रोजी सकाळी 8:12 वाजता सुरू होईल आणि 12 मार्च रोजी सकाळी 9:12 वाजता संपेल.

या दिवशी संध्याकाळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते. शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:26 ते 8:52 या वेळेत आहे. या वेळेत शिवपूजा केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व समस्या दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

भौम प्रदोष व्रताचे लाभ आणि पूजा विधी

  • भगवान शिवाची आराधना केल्याने पापांचा नाश होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते.
  • मंगळ ग्रहाशी संबंधित दोष दूर होण्यासाठी शिवलिंगावर पाणी, दूध, मध, आणि बेलपत्र अर्पण करणे अत्यंत लाभदायक असते.
  • “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि शुभ फळ मिळते. (Bhaum Pradosh Vrat 2025)
  • या दिवशी रुद्राभिषेक आणि महादेवाची धुप-दीपने पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती होते.

Title : Bhaum Pradosh Vrat 2025 shubh Muhurat 

 

Join WhatsApp Group

Join Now