Bharti Singh Second Child | कॉमेडियन भारती सिंह हे नाव कायमच चर्चेत असते. आपल्या अनोख्या विनोदशैलीमुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी भारती सध्या खास कारणामुळे चर्चेत आली आहे. भारती सिंह 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली असून तिच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची चाहूल लागली आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली होती.
प्रेग्नंसीदरम्यानही भारती सिंह आपल्या कामात सक्रिय होती. शूटिंग, व्लॉगिंग आणि चाहत्यांसोबत सतत संपर्कात राहण्याचा तिचा प्रयत्न सुरूच होता. तिचा मुलगा गोला उर्फ लक्ष्य आधीपासूनच सोशल मीडियावर लोकप्रिय असून, भारती-हर्षची फॅमिली बॉण्डिंग चाहत्यांना खूप आवडते.
शूटिंगदरम्यान त्रास, तातडीने रुग्णालयात दाखल :
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी भारती सिंह नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी सेटवर पोहोचली होती. मात्र, अचानक तिला त्रास जाणवू लागल्याने तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सकाळीच भारतीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून तिला मुलगा झाला आहे.
यामुळे गोला आता मोठा भाऊ झाला असून भारती-हर्षच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. काही व्हिडीओंमध्ये भारतीने मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र पुन्हा एकदा तिने मुलालाच जन्म दिला आहे. तरीही या गोड बातमीने कुटुंबीय आणि चाहते अत्यंत आनंदी झाले आहेत.
Bharti Singh Second Child | शुभेच्छांचा वर्षाव, चाहत्यांमध्ये उत्सुकता :
भारती सिंहने बाळाला जन्म दिल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते, मित्रपरिवार आणि मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी भारती आणि हर्ष लिंबाचिया यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. (Bharti Singh Second Child)
सध्या भारती किंवा हर्षकडून बाळाचा फोटो किंवा अधिकृत अपडेट शेअर करण्यात आलेला नाही. मात्र, चाहत्यांमध्ये बाळाचा पहिला फोटो कधी शेअर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसऱ्यांदा आई झालेल्या भारती सिंहच्या आयुष्यातील हा नवा अध्याय चाहत्यांसाठीही खास ठरत आहे.






