निकालानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर; शिवसेना नेत्याचा भाजप नेत्याला गंभीर इशारा

Bharat Gogawale । नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपचे नेते नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. नारायण राणे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत झाली. या लढतीत नारायण राणे यांचा विजय झाला.

दरम्यान निवडणुकीच्याकाळात शिंदे गटाचे नेते किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता. तेव्हा निलेश राणे म्हणाले की राणे कोणाला माफ करत नाहीत. त्यानंतर आता शिंदे गटाच्या एका नेत्याने राणे बंधूंना खडेबोल सुनावलं आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. यामुळे कार्यकर्ता म्हणून रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा आमच्याकडे यावेत, अशी मी मागणी देखील केली आहे. निलेश राणे यांच्या वक्तव्यावरून महायुतीमध्ये वाद होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिंदे गटातील नेते निलेश राणे यांच्यावर आक्रमक होताना दिसत आहेत.

यावर आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या चर्चा पूर्ण खोट्या आहेत, असं भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले होते. नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत घातल्यानंतर लोकसभेचं तिकीट दिलं. नारायण राणे यांना मिळालेली 74 हजार मतं ही आमची आहेत, असा दावा आता भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केला आहे.

“दोन्ही राणे बंधूंनी सांभाळून बोलावं”

किरण सामंत यांना वगळून आम्ही नारायण राणे यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे दोन्ही राणे बंधूंनी सांभाळून बोलावं. अन्यथा पुढच्या पदवीधर निवडणुकीबाबतीत आम्ही योग्य तो विचार करू, असा इशारा भरत गोगावले यांनी केला आहे. त्यानंतर भरत गोगावले म्हणाले की आमच्या देखील काही जागा पडल्या. पण जे झालं ते झालं. काही बहुजन आणि मुस्लिम बांधवांनी संविधान बदलेल म्हणून मतं दिली नाही, असं भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले आहेत.

“किरण सामंत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या संपर्कात”

भाजप नेते निलेश राणे यांनी किरण सामंत हे निवडणुकीच्याकाळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप केला होता. निलेश राणे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी त्यांना आगामी पदवीधर मतदारसंघाबाबत सुनावलं.

News Title – Bharat Gogawale Reply To Nitesh Rane About Kiran Samant Statement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार म्हणालेले ‘तुला बघतोच’, बजरंग सोनवणे म्हणाले ‘बघा मी निवडून…’

‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार; हवामान विभागाचा इशारा

“..महिन्यातच मोदी सरकार कोसळणार”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

“दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या”; पुण्यात जोरदार घोषणाबाजी

‘CISF च्या महिला जवानने माझ्या कानाखील मारली’; कंगनाचा गंभीर आरोप