अत्यंत भीषण अपघात! भरधाव टिप्परनं तिघांना चिरडलं, 8 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

On: March 7, 2025 2:22 PM
ST Bus Accident
---Advertisement---

Bhandara Accident | भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वार तिघांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या भीषण अपघातात 8 वर्षीय एकता सेलोकर हिचा जागीच मृत्यू झाला.  (Bhandara Accident )

सोबतच तिचे वडील विजय सेलोकर (45) आणि 10 वर्षीय वीर मारवाडे हे गंभीर जखमी झाले.  या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला असून, वाळूच्या वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महामार्ग रोको आंदोलन, वाहनांच्या लांबच लांब रांगा

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता वरठी रेल्वे उड्डाण पुलाजवळ ही दुर्घटना घडली. मृतक एकता आणि जखमी वीर हे दोघेही एका खासगी शिकवणी वर्गातून घरी परतत असताना हा अपघात झाला. संतप्त ग्रामस्थांनी घटनेच्या निषेधार्थ वाळू वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी महामार्ग रोखून धरला.

आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ग्रामस्थांचा इशारा आहे की, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. वरठी पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

जालन्यात महिला तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला

दरम्यान, जालना जिल्ह्यातील परतूर येथे अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदार प्रतिभा गोरे (Pratibha Gore) यांच्यावर वाळू माफियांकडून हल्ला करण्यात आला. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास दुधना नदी पात्रात ही घटना घडली.

परतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अखिल बिल्डर, इलियास कुरेशी, अमजत कुरेशी, इरफान शेख, जुनेद आणि इतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Bhandara Accident )

Title : Bhandara Accident Sand Truck Accident  

 

Join WhatsApp Group

Join Now