मुंबईकरांसाठी वाईट बातमी! प्रवास खर्च वाढला, बेस्ट बसचे भाडे थेट दुप्पट; ‘अशी’ असेल नवी भाडेवाढ

On: April 28, 2025 8:16 AM
Mumbai BEST Bus
---Advertisement---

BEST bus fare hike | मुंबईकरांसाठी एक मोठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्ट (BEST bus fare hike) बसच्या भाड्यात मोठी वाढ होणार आहे. बेस्टच्या तिकीट व मासिक पास दरवाढीला पालिका प्रशासनाने (BMC) मंजुरी दिली आहे.

मुंबईत बेस्ट बस भाडेवाढ निश्चित

मुंबईत आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाने सरासरी तिकिटात आणि पासमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर महागाईचा नवा फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वी बेस्टने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला होता, ज्याला अनेक संघटनांचा विरोध होता. मात्र सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा आग्रह धरला होता.

महाव्यवस्थापक एस. श्रीनिवास (S. Srinivas) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. पालिका प्रशासनाने आता या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर वाहतूक विभाग आणि नगरविकास खात्याच्या मान्यतेनंतर तिकीट दरवाढ लागू होईल. सध्या बेस्टचा वार्षिक महसूल ८४५ कोटी रुपये आहे, जो भाडेवाढीमुळे १४०० कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

नवी दरवाढ खालीलप्रमाणे 

साध्या बससाठी भाडेवाढ:

५ किमी अंतरासाठी ५ रुपयांवरून १० रुपये

१० किमी अंतरासाठी १० रुपयांवरून १५ रुपये

१५ किमी अंतरासाठी १५ रुपयांवरून २० रुपये

२० किमी अंतरासाठी २० रुपयांवरून ३० रुपये

वातानुकूलित बससाठी भाडेवाढ:

५ किमी अंतरासाठी ६ रुपयांवरून १२ रुपये

१० किमी अंतरासाठी १३ रुपयांवरून २० रुपये

१५ किमी अंतरासाठी १९ रुपयांवरून ३० रुपये

२० किमी अंतरासाठी २५ रुपयांवरून ३५ रुपये

मासिक बस पास दरवाढ:

५ किमी अंतरासाठी ४५० रुपयांवरून ८०० रुपये

१० किमी अंतरासाठी १००० रुपयांवरून १२५० रुपये

१५ किमी अंतरासाठी १६५० रुपयांवरून १७०० रुपये

२० किमी अंतरासाठी २२०० रुपयांवरून २६०० रुपये

मासिक बस पास वातानुकूलित बससाठी:

५ किमी अंतरासाठी ६०० रुपयांवरून ११०० रुपये

१० किमी अंतरासाठी १४०० रुपयांवरून १७०० रुपये

१५ किमी अंतरासाठी २१०० रुपयांवरून २३०० रुपये

२० किमी अंतरासाठी २७०० रुपयांवरून ३५०० रुपये

Title : BEST Bus Fare Hike Approved Mumbai Travel Becomes Costlier

 

Join WhatsApp Group

Join Now