Alum for Skincare l तुरटी हा एक बहुपयोगी घटक असून तो त्वचेसाठी तसेच एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. त्वचेवरील पिंपल्स, मुरूम, ब्लॅकहेड्स आणि डाग दूर करण्यासाठी तसेच दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो.
तुरटीचे आरोग्यासाठी फायदे :
तुरटीमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे ती त्वचेच्या संसर्गजन्य समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. दाढी करताना झालेल्या जखमांवर तुरटी लावल्यास रक्तस्त्राव थांबतो. तसेच, जर तुमचे दात दुखत असतील किंवा हिरड्यांना सूज आली असेल, तर तुरटीचा उपयोग फायदेशीर ठरतो.
चेहऱ्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा? :
– तुरटी पाण्यात विरघळवून चेहरा धुवा.
– साखर आणि तुरटी पावडर मिसळून स्क्रब करा.
– मुलतानी मातीमध्ये तुरटी मिसळून फेसपॅक बनवा.
– गुलाबपाण्यात तुरटी घासून चेहऱ्यावर लावा.
– ब्लॅकहेड्ससाठी नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये तुरटी मिसळून स्क्रब करा.
Alum for Skincare l त्वचेसाठी तुरटी लावताना घ्यावयाची काळजी :
– तुरटी 8 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नका.
– कोरड्या त्वचेसाठी आठवड्यातून एकदा, तर तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून दोनदा वापरा.
– तुरटी लावल्यानंतर फक्त साध्या पाण्याने चेहरा धुवा. साबण किंवा फेसवॉश वापरू नका.
– संवेदनशील त्वचा असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
– गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी तुरटीचा वापर करू नये.
– तुरटीचा नियमित आणि योग्य वापर केल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.






