Beed Loksabha | बीड लोकसभा मतदारसंघात सध्या चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. बजरंग सोनवणे यांनी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत बीडमध्ये (Beed Loksabha ) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः या घटनेची दखल घेतली आहे.
बीडच्या घटनेवर काय म्हणाले शरद पवार?
बीडमध्ये (Beed Loksabha ) काय निकाल लागणार याची साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे, मात्र बीडचा निकाल जाहीर करण्यास उशीर होत आहे. बीडमध्ये तणावाची परिस्थिती आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून फेरमतमोजणी करण्याची मागणी झाल्याचं कळतंय. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.
बीड जिल्ह्यामध्ये (Beed Loksabha ) कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे, असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे. @DGPMaharashtra @CollectorBeed @ECISVEEP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 4, 2024
बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव होणार?
बीड लोकसभा (Beed Loksabha ) मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. मधल्या काही फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे यांनी 30 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी ही आघाडी तोडली. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे काही हजार मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र होतं. अशा परिस्थितीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आता बीडचा निकाल काय लागणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
News Title: beed loksabha result sharad pawar
महत्त्वाच्या बातम्या-
लोकसभा निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कसा निवडून येतो बघतोच म्हणणाऱ्या अजित पवारांना कोल्हेंनी दिलं उत्तर!
“आता रडीचा खेळ खेळू नका, पराभव मान्य करा”, बंधू भगिनीला सल्ला दिल्याने खळबळ
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली!
स्मृती इराणींचा दारूण पराभव, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली






