मुंडे विरुद्ध सोनावणे; एका क्लिकवर कळणार कोण आघाडीवर कोण पिछाडीवर

On: June 4, 2024 12:19 PM
Beed loksabha election Exit poll
---Advertisement---

Beed l लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघ हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. अशातच आज निकाल जाहीर होणार होत आहे. यामध्ये उमेदवार आघाडी पिछाडीचा सामना करत आहेत. अशातच आता सर्वात मोठी अपडेट्स समोर आली आहे. बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. तर बीडमध्ये बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे 5400 मतांची आघाडीवर आहेत.

Beed l बीडमध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर :

बीड लोकसभा जागेवर गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. गेल्या चार लोकसभा निवडणुकीत मुंडे कुटुंबाने ही जागा जिंकली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी 2009 आणि 2014 मध्ये निवडणूक जिंकली होती.

मात्र 2014 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रीतम मुंडे पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. त्यानंतर 2019 मध्येही ते विजयी झाले होते, मात्र यावेळी पक्षाने पंकजा यांना उमेदवारी दिली होती.

पंकजा मुंडे पिछाडीवर :

पंकजा मुंडे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे रिंगणात होते. या जागेवर निवडणूक प्रचारादरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. या जागेवर एकूण 70.92 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील इतर जागांपेक्षा येथे चांगले मतदान झाले. या जागेसाठी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्याशिवाय आणखी 39 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत या दोघांमध्येच आहे.

दुपारी 12 च्या अपडेटनुसार, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे या तब्बल 14 हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर बजरंग सोनावणे हे या फेरीत पिछाडीवर आहेत.

News Title- Beed Loksabha Bajrang Sonawane 

महत्वाच्या बातम्या-

आज शंभर टक्के या राशी गुलाल उधळणार; पाहा कोणाचं नशीब उजळणार

मोठी बातमी! भाजपनं स्वबळावर केला 200 चा आकडा पार

शिरूरमध्ये अजितदादांना धक्का; अमोल कोल्हे यांनी आढळरावांना टाकलं मागे

भाजपला धक्का बसण्याची शक्यता; प्रणिती शिंदे आघाडीवर

हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now