“लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रांवर उधळले तर गैर काय?”; खोक्या भाईचा सवाल

On: March 11, 2025 11:16 AM
Beed Crime Khokya Bhai Justifies His Actions 
---Advertisement---

Beed Crime | बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई (Satish Bhosale aka Khokya Bhai) याच्या गुन्हेगारी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, त्याच्या अनेक गुन्ह्यांचा तपशील समोर आला. (Beed Crime)

पोलिस त्याचा शोध घेत आहेत, मात्र तो अद्याप हाती लागलेला नाही. दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतःची बाजू मांडली आहे. यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत.

“मित्रासाठी पैसे उधळले, त्यात गैर काय?” 

एका लग्नसमारंभात पैसे उधळण्याच्या घटनेवर भाष्य करताना खोक्या भाई म्हणतो, “लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय बिघडलं?” त्याने स्पष्ट केले की, तो कष्टाने मिळवलेला पैसा होता आणि आनंदाच्या क्षणी तो खर्च केला.

“कोणी बायांवर पैसे उधळतो, हे तुम्ही बघा. मी माझ्या मित्राच्या लग्नात आनंदाने पैसे उधळले, त्यात माज कसला? इन्स्टाग्रामवर लाखो लोक करोडो रुपये उधळताना दिसतात, मग माझ्या बाबतीत वेगळा नियम का?” असा सवालही त्याने केला.

बॅटने मारहाण प्रकरणावर स्पष्टीकरण

बीड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविषयी बोलताना सतीश भोसलेने सांगितले की, “माझ्या मित्राच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळेच संतापाच्या भरात मी त्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली.”

त्याने यामध्ये जातीय वाद नसल्याचेही स्पष्ट केले. “मी आदिवासी आहे, तर माऊली खेडकर वंजारी समाजाचा आहे. मग यात जातीय वाद कसा येतो?” असा प्रश्न त्याने उपस्थित केला. (Beed Crime)

खोक्या भाई सरेंडर होणार?

दरम्यान,  सतीश भोसले लवकरच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू शकतो. दरम्यान, पोलिसांनी त्याची आलिशान कार शिरूर परिसरातून जप्त केली आहे.

Title : Beed Crime Khokya Bhai Justifies His Actions 

 

Join WhatsApp Group

Join Now