Baramati Loksabha Election | राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Election) नणंद विरूद्ध भावजय अशी टक्कर पाहायला मिळाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी जोर लावला होता. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Election) लोकसभा निवडणुकीआधी अनेक प्रचारसभा झाल्या होत्या. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या तरीही सुनेत्रा पवारांना पराभव स्विकारावा लागला.
अशातच आता अजित पवार यांच्या गटाने केवळ रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवली. रायगड येथून सुनील तटकरे यांनी विजय मिळवला. मात्र अजित पवार यांच्याकडून आधी मुलगा पार्थ पवार याला मावळमधून निवडून देता आलं नाही. नंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha Election) पत्नी सुनेत्रा पवार यांना विजय मिळवून देण्यात अजित पवार हे अपयशी ठरले आहेत.
पार्थ पवारला विजय मिळवून देता आलं नाही
गेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांना मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळी पार्थ पवार यांच्याविरोधातही सध्याचे मावळचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे उमेदवार होते. त्यावेळी अजित पवार यांना आपला मुलगा पार्थ पवारला विजय मिळवून देता आलं नाही. तसेच दुसरीकडे यंदाच्या लोकसभा निवडणूक 2024 मध्येही त्यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना विजय मिळवून देण्यास अयशस्वी ठरले आहेत. (Baramati Loksabha Election)
अजितदादा पत्नीला निवडून आणण्यासाठी सपशेल फेल ठरले
सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांनी आपली बहिण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभं केलं होतं. बारामतीकर संभ्रम अवस्थेत होते. दोन्हीही एकाच घरातील असल्याने नेमकं मत कोणाला द्यायचं? असा सवाल उपस्थित होताना दिसत होता. अजित पवार यांच्या सभा आणि शरद पवार यांच्या सभांना समान गर्दी पाहायला मिळाली होती. अजित पवार यांनी जोमात प्रचार सुरू ठेवला होता. तर सुप्रिया सुळे यांनी देखील जोमात प्रचार सुरू ठेवला होता. मात्र शेवटी सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनी विजयाचा कौल दिला. अशातच आता अजित पवार हे आधी मुलाला आणि नंतर आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सपशेल फेल ठरले आहेत.
Bews Title – Baramati Loksabha Election In Ajit pawar Not Can Do Anything For Her Wife Sunetra pawar
महत्त्वाच्या बातम्या
सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी
मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय
रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं
महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!






