सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका! व्याज दरात केली ‘तब्ब्ल’ एवढ्या टक्क्यांची वाढ

On: June 8, 2024 1:12 PM
Home Loan
---Advertisement---

Bank Of Baroda l बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी या बँकेतून गृहकर्ज घेतले आहे त्यांना आता अधिक व्याज भरावे लागणार आहे.

व्याजदर किती वाढले? :

बँकेने 10 एप्रिलपासून आपला MCLR म्हणजेच किरकोळ निधी आधारित दर वाढवले ​​आहेत. बँकेने MCLR 5 बेस पॉइंट्स किंवा 0.05% ने वाढवला आहे. ही वाढ 1 महिन्याची मुदत असलेल्या लोनशिवाय सर्व मुदतीवर करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे. आता बँकेकडून कमाल कर्ज दर 8.85% झाला आहे.

बँकेने कर्ज देण्याचा दर 8.05% वरून 8.10% केला आहे. तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 5 बेसिस पॉइंट्सची वाढ देखील करण्यात आली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत 8.40% वरून 8.45% पर्यंत वाढले, सहा महिन्यांच्या कार्यकाळात 8.60% वरून 8.65% पर्यंत वाढले; आणि 1 वर्षाच्या कार्यकाळात हा दर 8.80% वरून 8.85% इतका वाढला आहे. एका महिन्याच्या कार्यकाळावरील दर 8.30% वर अपरिवर्तित ठेवण्यात आला आहे.

Bank Of Baroda l नवीन व्याजदर कधी लागू होणार? :

बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील दर वाढवले आहे. नवीन व्याजदर हा 12 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. याआधी बँकेने जानेवारी महिन्यातही कर्ज महाग केले होते. त्यानंतर 12 जानेवारी 2024 पासून सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 5 बेस पॉइंट्स किंवा 0.05% ने वाढवण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच गृहकर्ज योजना आखत असते. अशातच आता बँकेने MCLR 5 बेस पॉइंट्स किंवा 0.05% ने वाढवला असल्याने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. तसेच बँक ग्राहकांना कमाल कर्ज दर 8.85% व्याज दिला आहे.

News Title – Bank of Baroda hikes MCLR by 5 basis points

महत्त्वाच्या बातम्या

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

नगरमध्ये मोठा राडा; निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजपचा गंभीर आरोप

मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; ऑनलाईन सेवा बंद राहणार

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा असणार खास; शपथविधी कधी व किती वाजता होणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now