Bank Holidays In March | मार्च महिन्यात विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये मिळून बँका एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये ५ रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार, होळी (Holi) आणि ईद-उल-फितर (Eid-al-Fitr) यांसारख्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे, बँकेशी संबंधित महत्वाचे काम असल्यास, सुट्ट्या लक्षात घेऊन नियोजन करणं आवश्यक आहे. (Bank Holidays In March)
बँक सुट्ट्यांची संपूर्ण माहिती
मार्च महिन्यात, ५ रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार मिळून, एकूण १४ दिवस बँका बंद राहतील. १३ मार्चला होलिका दहन आणि ३१ मार्चला ईद-उल-फितर असल्यामुळे, त्या दिवशीही देशभरातील बँका बंद असतील.
शिवाय, वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील. उदाहरणार्थ, ७ मार्चला चापचर कुट फेस्टिव्हलमुळे (Chapchar Kut festival) आयझॉलमध्ये (Aizawl) बँक बंद राहील.
२७ मार्चला शब-ए-बरात (Shab-e-Barat) आणि २८ मार्चला जुमात-उल-विदा (Jumat-ul-Vida) असल्यामुळे जम्मू (Jammu) आणि श्रीनगरमध्ये (Srinagar) बँका बंद राहतील.
ऑनलाइन बँकिंगचा पर्याय
बँक सुट्ट्या असल्या तरी, ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग, एटीएम (ATM) यांसारख्या सुविधा वापरता येतील. या सुविधांमुळे, बँकेच्या सुट्ट्यांचा बँकिंग व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. मार्च महिन्यात शेअर बाजारही १२ दिवस बंद राहणार आहे. (Bank Holidays In March)






