बँकेची काम आजच उरकून घ्या, सलग 4 दिवस बँका बंद राहणार

On: September 19, 2024 11:08 AM
November bank holiday
---Advertisement---

Bank Holiday l सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. त्यामुळे संपूर्ण महिन्यात 15 दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. अलीकडेच 14, 15 आणि 16 सप्टेंबरला सलग तीन दिवस बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा 20 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.

सलग चार दिवस बँका बंद राहणार :

यामध्ये14 सप्टेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार होता, तर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद होत्या. याशिवाय सोमवारी ईद-ए-मिलादनिमित्त सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद होत्या. मात्र RBI देशभरातील बँकांच्या यादी एकत्रितपणे जाहीर करते. त्यानुसार देशभरात वेगवेगळ्या भागात पुढील चार दिवस बंद राहणार आहे.

RBI ने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये 20 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी निमित्त जम्मू आणि श्रीनगरच्या सर्व बँकांमध्ये सुट्टी असेल. त्याचवेळी, शनिवार, 21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिनामुळे केरळमधील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही, तर रविवार, 22 सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी आहे.

Bank Holiday l या दिवशी बँका बंद राहणार :

मात्र बँका जरी बंद असल्या तरी देखील बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकता. याशिवाय, तुम्ही UPI द्वारे व्यवहार करू शकता, तर तुम्ही ATM द्वारे पैसे काढू शकता.

20 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (शुक्रवार) जम्मू आणि श्रीनगर
21 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) – केरळ
22 सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत
23 सप्टेंबर – शूरवीरांचा हुतात्मा दिवस (सोमवार) – हरियाणा आणि महाराजा हरिसिंह जी (जम्मू आणि श्रीनगर) यांचा जन्मदिवस.

News Title : Bank holiday in September 2024

महत्वाच्या बातम्या –

जोरदार उसळीनंतर सोनं पुन्हा झालं स्वस्त; सध्या काय आहेत किंमती?

ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार

आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर

तिरुपतीच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी?, चंद्राबाबूंचा धक्कादायक आरोप

आता पालकांसह मुलांचंही भविष्य होणार सुरक्षित; मोदी सरकारने आणली भन्नाट स्कीम

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now