Bank Fraud | देशभरात बँक फसवणुकीचे (Bank Fraud) प्रमाण वाढत असल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. बँकेच्या नावाने फसवणुकीचे SMS, ईमेल आणि WhatsApp संदेश पाठवून ग्राहकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. SBI आणि सरकारने ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
बँकिंग फसवणुकीचे नवे प्रकार
SBI ग्राहकांना बँकेच्या नावाने बनावट मेसेज आणि ईमेल पाठवून त्यांना रिवॉर्ड पॉइंट मिळाल्याचे आमिष दाखवले जाते.
- फसवणूक करणारे ₹9,980 पर्यंतचे रिवॉर्ड मिळाल्याचा दावा करतात आणि एका लिंकवर क्लिक करण्यास सांगतात.
- या लिंकवर क्लिक केल्यास किंवा APK फाइल डाउनलोड केल्यास बँकिंग डेटा चोरी होतो आणि खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात.
फसवणुकीसाठी वापरले जाणारे मार्ग:
✔ फर्जी SMS आणि ईमेल: ग्राहकांना बनावट बँक मेसेज पाठवले जात आहेत.
✔ WhatsApp स्कॅम: संशयास्पद लिंक असलेले मेसेज ग्राहकांना मिळत आहेत.
✔ सोशल मीडिया फसवणूक: फेसबुक, ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे फसवे मेसेज व्हायरल होत आहेत.
SBI आणि सरकारची महत्त्वाची सूचना:
SBI ने स्पष्ट केले आहे की, बँक कधीही SMS, ईमेल किंवा WhatsApp वर लिंक पाठवत नाही.
PIB Fact Check नेही हा मेसेज फर्जी असल्याचे जाहीर केले आहे.
RBI आणि सरकारने ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. (Bank Fraud)
जर तुम्हाला असे फसवे मेसेज मिळाले तर काय करावे?
⚠ लिंकवर क्लिक करू नका: कोणत्याही अनोळखी मेसेजमधील लिंक ओपन करू नका.
⚠ APK फाइल डाउनलोड करू नका: कोणताही बँक तुम्हाला अॅप डाउनलोड करण्यास सांगणार नाही.
⚠ फसवे कॉल टाळा: जर कोणी SBI अधिकारी असल्याचे सांगून OTP किंवा बँकिंग डिटेल्स विचारत असेल तर कॉल कट करा.
⚠ SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: कोणत्याही ऑफर किंवा रिवॉर्डबद्दल माहिती मिळवण्यासाठी थेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.
⚠ सायबर सेल किंवा बँकेत तक्रार करा: सायबर क्राईम हेल्पलाइन (1930) वर तक्रार करा किंवा बँकेला माहिती द्या. (Bank Fraud)






