Bangladeshi women arrest | पुण्यातील (Pune) बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या काही महिन्यांपासून शहरात राहत असल्याचे तपासात समोर आले. वेश्याव्यवसायाच्या संशयावरून ही मोहीम राबवण्यात आली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Bangladeshi women arrest)
फेक कागदपत्रांवर वास्तव्यास, रेड लाईट भागात कारवाई :
बुधवारी सायंकाळी पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात छापा टाकला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या भागात काही बांगलादेशी महिला शरीरविक्री करत असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता एकूण २२ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी ११ महिला बांगलादेशातून आलेल्या असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिस उपायुक्त कृषीकेश रावळे (Krishikesh Ravele) यांनी दिली.
या महिलांकडे भारतीय ओळखपत्रे असल्याचे प्रथमदर्शनी आढळले; मात्र तपासात ती आधारकार्ड आणि रेशनिंग कार्ड बनावट असल्याचे उघड झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात बेकायदेशीररीत्या राहत होत्या. सध्या त्यांच्या वास्तव्याचा कालावधी, संपर्क जाळे आणि संबंधित व्यक्तींबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (fake Aadhaar card)
Bangladeshi women arrest | पोलीस आयुक्तांचा आढावा, रात्री विशेष सर्च ऑपरेशन :
या कारवाईनंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. खडक पोलीस ठाण्याने ११ बांगलादेशी महिलांना अटक केली असून प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने पोलीस आयुक्त स्वतः फरसखाना पोलीस ठाण्यात भेट देऊन तपशीलवार माहिती घेतली. (Bangladeshi women arrest)
फरासखाना पोलीस स्थानकाच्या हद्दीत खडक पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सर्च मोहीम राबवली. बुधवार पेठ परिसरातील विविध ठिकाणी तपासणी करून संबंधित महिलांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व महिलांविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात बांगलादेशी नागरिकांच्या उपस्थितीबाबत पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.
News Title : Bangladeshi Women Arrested in Pune






