Bajrang Sonawane Car Accident | बीड लोकसभा मतदारसंघात टफ फाईट झाल्याचं पाहायला मिळालं. बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेते बजरंग सोनवणे अखेर विजयी झाले. मुंडेंचा बालेकिल्ला असणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघाला सुरूंग लावत बजरंग सोनवणे यांनी विजयाची तुतारी वाजवली आहे. याठिकाणी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे फॅक्टर ठरले आहेत. (Bajrang Sonawane Car Accident)
बजरंग सोनवणे हे रात्री विजयानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले. त्यावेळी बजरंग सोनवणेंच्या गाडीचा अपघात झाल्याचं दिसून आलं. बीडमधून निवडून अधिकाऱ्यांकडून बजरंग सोनवणे यांनी विजयाचं प्रमाणपत्र घेतलं आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला होता. त्यानंतर बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे. (Bajrang Sonawane Car Accident)
अपघात कसा झाला?
बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी ही बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली असल्याने अपघात (Bajrang Sonawane Car Accident) झाला. या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत. तर काहीजण सुखरूप आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान यानंतर त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. (Bajrang Sonawane Car Accident)
बीड, परभणी आणि जालना तसेच इतर काही मतदारसंघामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम झाल्याचं दिसत आहे. यामुळे मराठा विरूद्ध ओबीसी असं मतांचं ध्रुवीकरण पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण आणि हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांवर विजय मिळवला आहे.
बीडमध्ये जरांगे फॅक्टर
मनोज जरांगे पाटील यांचा सर्वाधिक परिणाम हा बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. रात्री उशीराने बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला. तेव्हा बजरंग सोनवणे 7 हजार मतांनी विजयी झाले असल्याची माहिती समोर आली. मुंडेंच्या बालेकिल्ल्याला शरद पवार यांनी सुरूंग लावला असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. याचं श्रेय हे मनोज जरांगे पाटील यांना जात आहे.
News Title – Bajrang Sonawane Car Accident News Update
महत्त्वाच्या बातम्या
दारुण पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनं खळबळ
संविधान वाचवण्यासाठी ‘या’ नेत्यांनी एकत्रित यावे; बड्या नेत्याचं विधान
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी
महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष कोणता?






