Baba Siddique l अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे. तर तिसरा आरोपी हा फरार आहे. मात्र या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे 15 पथक तैनात करण्यात आले आहेत. आता या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
या घटनेतील आरोपींना सोडणार नाही :
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. याशिवाय ते पुढे म्हणाले की, मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा देखील एकनाथ शिंदे दिला आहे.
याशिवाय महाविकास आघाडीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था इतकी बिघडली होती की गृहमंत्री देखील जेलमध्ये गेले होते अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच आरोपीने पोलिसांवर गोळी चालवली तर पोलिसांनी देखील गोळी का चालवली? असं विचारतात. त्यामुळे हे डबल ढोलकीवाले आहेत. तसेच यांच्यामध्ये काही नैतिकता नाही असं ते म्हणाले आहेत.
Baba Siddique l कायदा हातात घेईल त्याला सोडणार नाही :
बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच या घटनेतील मुंबईतील दोघांना अटक केली असून एक आरोपी फऱार आहे, त्यामुळे त्याला लवकर पकडलं जाईल. याशिवाय यासंदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लढून फाशी देण्याची विनंती देखील करु असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
याशिवाय आता जो कायदा हातात घेईल त्याला मात्र सोडणार नाही. तसेच त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाणार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
News Title – Baba Siddique Murder Statement On Eknath Shinde
महत्त्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृतीबदल महत्त्वाची माहिती समोर
सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींनी आणला होता पेपर स्प्रे? यामागचं धक्कादायक कारण समोर
बिष्णोई गँगचं ‘पुणे कनेक्शन’, अत्यंत धक्कादायक माहिती समोर
देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?
धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणीचा’ मृत्यू






