बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

On: March 17, 2025 9:07 AM
Baba Siddique Murder Case Main Accused Tracked in Azerbaijan
---Advertisement---

Baba Siddique Murder Case | बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी झीशान अख्तर उर्फ जस्सी पूरवाल (Zeeshan Akhtar) याचे लोकेशन अखेर ट्रॅक करण्यात आले आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, झीशान सध्या अझरबैजानमध्ये (Azerbaijan) असल्याचे समोर आले आहे.

अझरबैजान सोडण्याच्या तयारीत झीशान अख्तर

झीशान अख्तरला भारताबाहेर पाठवण्यात पाकिस्तानी डॉन शहजाद भाटीचा (Shehzad Bhatti) हात असल्याचे उघड झाले आहे. भाटी आणि झीशानने यासंदर्भात स्वतंत्र व्हिडिओ जारी केला होता, मात्र त्यावेळी त्याच्या ठिकाणाची माहिती मिळालेली नव्हती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, झीशान लवकरच अझरबैजान सोडण्याच्या तयारीत असून, यावेळी त्याला मदत करणारा खलिस्तानी दहशतवादी हॅप्पी पासियान (Happy Passian) असणार आहे.

परदेशात आश्रय घेतल्याचा झीशानचा दावा

शहजाद भाटी पाकिस्तानातील कुख्यात माफिया डॉन फारुख खोखरचा (Farooq Khokhar) जवळचा सहकारी आहे. त्याच्याच मदतीने झीशान अख्तर भारतातून फरार झाला. यापूर्वी झीशानचा नेपाळमध्ये ठावठिकाणा आढळला होता, त्यानंतर त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. झीशानने स्वतः व्हिडिओमध्ये सांगितले होते की, “भारतात माझ्यावर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. भट्टी भाईने मला भारताबाहेर नेले आणि सुरक्षित आश्रय दिला.”

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि लॉरेन्स गँगशी संबंध

झीशान अख्तर हा पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील नकोदर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर खून, दरोडा आणि गंभीर गुन्ह्यांचे एकूण 9 प्रकरणे दाखल आहेत. तो 7 जून 2024 रोजी तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगात त्याची ओळख गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) मुख्य गुंड विक्रम ब्रारशी (Vikram Brar) झाली आणि त्याने लॉरेन्स गँगमध्ये प्रवेश केला. याच गँगच्या सूचनेनुसार, झीशानने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी डॉन शहजाद भाटी कोण आहे?

शहजाद भाटी हा पाकिस्तानमधील कुख्यात गुन्हेगार असून, तो खून, जमिनीचे वाद, शस्त्रास्त्रांची तस्करी यासह अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहे. सध्या तो दुबईत वास्तव्यास असून, त्याचे नेटवर्क अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि दुबईपर्यंत पसरलेले आहे. तो आपल्या बॉस फारुख खोखरसह हे संपूर्ण गुन्हेगारी जाळे चालवतो.

Title : Baba Siddique Murder Case Main Accused Tracked in Azerbaijan

 

Join WhatsApp Group

Join Now