ऑगस्टमध्ये पाऊस किती कोसळणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

On: August 1, 2026 11:25 AM
Maharashtra Rain
---Advertisement---

Maharashtra Rain | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद होत असून खरीप हंगामासाठी ही परिस्थिती समाधानकारक ठरत आहे. आता ऑगस्ट महिन्यातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. राज्यभर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भ (Vidarbha) या भागांसाठी दिलासादायक बातमी आहे.

ऑगस्टमध्ये मराठवाडा-विदर्भाला चांगल्या पावसाची शक्यता :

यंदाच्या जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने अपेक्षेप्रमाणे साथ दिली नव्हती. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या उशिरा झाल्या. मात्र जूनच्या उत्तरार्धात आणि जुलैच्या सुरुवातीपासून राज्यभर पावसाने जोर धरला. परिणामी, दुबार पेरणीचे संकट मोठ्या प्रमाणात टळले असून राज्यात सुमारे 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून अनेक भागांत सातत्याने पाऊस कोसळत असून काही जिल्ह्यांसाठी आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाबाबतचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन विभागांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Rain | जुलैतील पावसाची नोंद, नाशिकमध्ये रेड अलर्ट :

जुलै महिन्यात विदर्भात तब्बल 484.7 मिमी पावसाची नोंद झाली, तर मराठवाड्यात 281.7 मिमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) भागात सरासरी 387.2 मिमी पाऊस अपेक्षित असतो, मात्र यंदा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला.

तसेच कोकण (Konkan) विभागात जुलैमध्ये 1767.5 मिमी पावसाची नोंद झाली. हंगामाच्या सुरुवातीला प्रशांत महासागरातील एल निनो (El Niño) परिस्थितीमुळे महाराष्ट्रात पाऊस कमी राहील, असा अंदाज अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र जूनच्या अखेरीपासून आणि जुलैच्या पहिल्याच दिवसापासून राज्यभर जोरदार पावसाने हजेरी लावून हे अंदाज खोटे ठरवले.

News Title: August Rain Outlook Brings Farmers Relief

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now