आज उभयचरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; ‘या’ राशी होणार धनवान

On: September 18, 2024 11:10 AM
Astrology
---Advertisement---

Astrology Panchang | आज 18 सप्टेंबरचा दिवस अत्यंत खास आहे. आजच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. याचबरोबर आज उभयचरी योग, वृद्धि योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र असे अनेक शुभ संयोग जुळून येणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. त्याचबरोबर यावर्षी आजपासून 18 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे. पितृपक्षाच्या दिवशी जुळून आलेल्या या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Astrology Panchang)

आज ‘या’ राशी होणार धनवान

मिथुन रास : या राशीसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना आज कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरु असतील तर ते लवकर संपुष्टात येतील. (Astrology Panchang)

कन्या रास : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. तसेच, तुमच्या आरोग्याच्या समस्या देखील आज संपतील. नोकरी करणाऱ्यांना आज नवीन संधी मिळतील.

वृश्चिक रास : आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. आजचा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा जाईल. तुम्हाला आज धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. (Astrology Panchang)

मकर रास : आज तुम्हाला व्यवसायात पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. . या राशीचे लोक ज्यांना परदेशात फिरायला जायचं आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आज तुम्हाला नोकरीसाठी कॉल येईल.

कुंभ रास : दीर्घकाळासाठी तुम्ही आज गुंतवणूक कराल. सरकारी योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील. काही गैरसमजामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील, परंतु कुटुंबातील मोठ्यांचा पाठिंबा मिळेल. खूप दिवसांपासून टाळत असलेले काम आज पूर्ण होईल. (Astrology Panchang)

News Title : Astrology Panchang 18 September

महत्वाच्या बातम्या –

बाप्पा गेले गावी, राज्यात पावसाचं होणार पुन्हा आगमन; कुठे-कुठे बरसणार?

“राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे”; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

आजचा दिवस संकटांचा, पदोपदी राहावं लागणार सावध;.. ही रास तुमची तर नाही?

पुण्यात भाजपला मोठा झटका, माजी आमदाराने केला शरद पवार गटात प्रवेश

रेल्वेत होतेय बंपर भरती, तरूणांनो सरकारी नोकरीची संधी गमावू नका!

Join WhatsApp Group

Join Now