शिंदे सेनेतील ‘या’ दोन बड्या नेत्यांविरोधात उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!

On: October 19, 2024 12:34 PM
Assembly Election 2024 Possible candidature list of Uddhav Thackeray
---Advertisement---

Assembly Election 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. दोन्ही आघाडीकडून सध्या जागावाटप संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहेत. काही मीडिया रिपोर्टमध्ये ठाकरेंच्या संभाव्य 32 जणांची नावे देखील देण्यात आली आहेत. त्यात सध्या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. (Assembly Election 2024)

भाजपचे माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांनी नुकताच उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय. राजन तेली यांनी गुरुवारी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी नारायण राणे यांच्याकडून भाजपमध्ये आपले खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला. राजन तेली यांची गणना एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थकांमध्ये व्हायची. पण, आता त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

दीपक केसरकर व शहाजी बापूविरोधात नवा डाव

राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास, शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत होऊ शकते. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. (Assembly Election 2024)

यामुळे सोलापूरमध्ये अजित पवारांना मोठा फटका बसला आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात आता त्यांचेच गेल्या वेळचे सहकारी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील निवडणूक रिंगणात उतरू शकतात. ठाकरेंच्या संभाव्य यादीत दीपक आबा साळुंखे यांचं देखील नाव असल्याने ठाकरेंची दीपक केसरकर आणि शहाजी बापू यांच्याविरोधात ही मोठी खेळी मानली जाईल.

दीपक आबा साळुंखे यांना जर उमेदवारी मिळाली तर सांगोल्यामध्ये शहाजी बापूंविरोधात त्यांची थेट लढत होईल. शिंदे गटाच्या या दोन नेत्यांविरोधात ठाकरेंनी हा डाव आखला आहे. सावंतवाडी विधानसभेत दीपक केसरकर यांना तर सांगोल्यात शहाजी बापू यांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने मोट बांधली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार-

आदित्य ठाकरे – वरळी
अजय चौधरी – शिवडी( सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार
राजन साळवी – राजापूर
वैभव नाईक – कुडाळ
नितीन देशमुख- बाळापूर
सुनिल राऊत – विक्रोळी
सुनिल प्रभू – दिंडोशी
भास्कर जाधव – गुहागर
रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
कैलास पाटिल – धाराशिव
संजय पोतनीस – कलिना
उदयसिंह राजपूत – कन्नड
राहुल पाटील – परभणी
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
अनिल कदम – निफाड (Assembly Election 2024)
दीपेश म्हात्रे -डोंबिवली
सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
मनोहर भोईर – उरण
किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
उदयसिंह राजपूत- कन्नड मतदारसंघ
सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
राजन तेली – सावंतवाडी
दीपक आबा साळुंखे – सांगोला
विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर

News Title : Assembly Election 2024 Possible candidature list of Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या –

लाडक्या बहीणींनो सरकारने थांबवला योजनेचा हप्ता; आता दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

ठाकरेंचे उमेदवार ठरले! कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?

दिवाळीपूर्वीच सोनं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शुक्र आणि शनीची युती ‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!

“सलमानने कधी साधं झुरळही मारलं नाही, तो माफी मागणार मागणार नाही”

Join WhatsApp Group

Join Now