सुनावणी थांबवली अन् महिला पोलिसाच्या मोबाईलवरून अशोक खरातला व्हिडीओ कॉल, वाचा काय घडलं?

On: April 14, 2026 4:55 PM
Ashok Kharat Case (1)
---Advertisement---

Ashok Kharat Case | नाशिक (Nashik) येथील अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात कोर्टातील सुनावणीदरम्यान अनोखी घटना घडली. तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थांबल्यानंतर महिला पोलिसांच्या मोबाईलवरून थेट व्हिडिओ कॉल करून आरोपीशी संपर्क साधण्यात आला. अखेरीस न्यायालयाने त्याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुनावणीत तांत्रिक अडथळा आणि व्हिडिओ कॉल :

अशोक खरातला (Ashok Kharat Case) चौथ्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी नाशिक सत्र न्यायालयात (nashik court hearing) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणी सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि कोर्टातील आवाज आरोपीपर्यंत पोहोचेनासा झाला. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया सुमारे 10 ते 12 मिनिटांसाठी थांबवावी लागली.

यानंतर कोर्टात उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलचा वापर करून, आरोपीजवळ असलेल्या पोलिसांशी व्हिडिओ कॉल करण्यात आला. या माध्यमातून पुन्हा संपर्क प्रस्थापित करून सुनावणी पुढे सुरू करण्यात आली. त्यावेळी न्यायाधीशांनी अशोक खरातला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का, असा प्रश्न विचारला असता त्याने नकारार्थी उत्तर दिले.

Ashok Kharat Case | सरकारी बाजू आणि न्यायालयाचा निर्णय :

या प्रकरणात सरकारी वकिलांनी आरोपीवर गंभीर आरोप मांडले. महिलांना प्रसादाच्या नावाखाली पाणी किंवा पेढे देऊन त्यात गुंगी आणणारे पदार्थ मिसळले जात होते, अशी माहिती त्यांनी न्यायालयासमोर ठेवली. या पदार्थांचे नेमके स्वरूप शोधण्यासाठी आणि गुन्ह्याचा तपास सखोल करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच आरोपी स्वतःला देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलांची फसवणूक करत असल्याचेही नमूद करण्यात आले.

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी याला विरोध करत आधीच्या प्रकरणांमध्येही असेच युक्तिवाद करण्यात आल्याचे सांगितले. संबंधित तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सुरू असल्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र, विविध महिलांशी संबंधित अनेक तक्रारींचा तपास आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने अखेर अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

News title : Ashok Kharat Custody Extended Till April 18

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now