महायुतीतील सर्वजण मिळून अमित ठाकरेंना विजयी करू; भाजप नेत्याचं मोठं विधान

On: October 26, 2024 3:48 PM
Mahim Vidhan Sabha
---Advertisement---

Amit Thackeray l राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकारणात अनेक राजकीय बदल होताना दिसत आहेत. अशातच आता मनसेने माहीममध्ये अमित ठाकरेंना उमेदवारी दली आहे. मात्र आता माहीममधून अमित ठाकरेंना भाजप पक्षाचा पाठिंबा असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता भाजप अमित ठाकरेंना पडद्यामागून पाठिंबा देतंय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? :

माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच अमित ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी आशिष शेलार यांना प्रस्ताव पाठवणार असल्याचं देखील समजत आहे. कारण सदा सरवणकरांच्या उमेदवारीला देखील विरोध नसल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय आता अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवाल देखील आशिष शेलार यांनी विचारला आहे.

दरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीनुसार, माहीम मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. याशिवाय शिवसेनेकडून सदा सरवणकर तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाककडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Amit Thackeray l आशिष शेलार नेमकं काय म्हणाले? :

यासंदर्भात आशिष शेलार यांनी माहिती दिली आहे. “मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनाही विनंती करणार आहे. कारण महायुतीत कोणताही मतभेद, दरार नाही. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला देखील आमचा विरोध नाही.

परंतु असं का होऊ शकत नाही की, महायुती म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्याच घरातील म्हणजेच राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असेल तर महायुती मिळून आपण सर्वजण मिळून त्याला समर्थन देऊ आणि आपण सर्वजण मिळून अमित ठाकरेंना निवडून देऊ,” असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

News Title – Ashish Shelar on Amit Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांच्या ‘या’ नेत्यापासून भाजप दोन हात लांब राहणार!

फडणवीसांची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क

“सुजय मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल”; शालिनीताई विखे संतापल्या

देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विजयी होणार का?

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 23 जणांना मिळालं विधानसभेचं तिकीट

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now