Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खत्रा आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने 17 मेरोजी केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता.
आज 12 जुलैरोजी याबाबत निर्णय देण्यात आला. आज कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची शिफारस केली आहे. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही केजरीवाल यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर
त्यांना सीबीआयकडूनही अटक झाली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.सुनावणी पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय.
केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी जामीन मंजूर करत हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश दिले.
सीबीआय प्रकरणी 18 जुलैरोजी होणार सुनावणी
तसेच जोपर्यंत मोठे खंडपीठ निर्णय घेत नाही तोपर्यंत केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत.
केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांचे वकील विवेक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय प्रकरणी 18 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल.
News Title- Arvind Kejriwal granted bail
महत्वाच्या बातम्या-
आज ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार, पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार
शहाजीबापू रुग्णालयात तर गणपत गायकवाड जेलमध्ये; महायुतीचं मतांचं गणित बिघडणार?
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; कुणाची विकेट पडणार?
कतरिना कैफ होणार आई?, सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
शत्रुघ्न सिन्हा यांना लाडक्या जावयाकडून मिळालं मोठं सरप्राईज!






