अर्जुन कपूर पुन्हा प्रेमात पडला? क्रिकेट मैदानावर ‘या’ अभिनेत्रोसोबत दिसला

On: July 20, 2026 1:29 PM
Arjun Kapoor
---Advertisement---

Arjun Kapoor | अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे नाव कोणाशीही जोडले गेले नव्हते. मात्र आता अभिनेत्री साहिबा बाली (Sahiba Bali) हिच्यासोबत त्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील लॉर्ड्स (Lord’s) येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात दोघे एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

लॉर्ड्सवरील उपस्थितीने वाढल्या चर्चा :

मलायका अरोरासोबतचे नाते संपल्यानंतर अर्जुन कपूर बराच काळ एकटाच दिसत होता. त्याची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) हिच्या लग्नावेळीही तो एकटाच उपस्थित होता. त्यामुळे त्याच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची कोणतीही चर्चा नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरचे नाव अभिनेत्री साहिबा बालीसोबत जोडले जात असून चाहत्यांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

19 जुलै रोजी इंग्लंडमध्ये झालेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी अर्जुन कपूर आणि साहिबा बाली स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामन्यादरम्यान स्टँडमध्ये बसलेले दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोंनंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना आणखी वेग आला असून त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Arjun Kapoor | व्हायरल फोटोंनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता :

व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये अर्जुन कपूर निळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे, तर त्याच्या शेजारी काळा गॉगल घातलेली साहिबा बाली बसलेली दिसते. विशेष म्हणजे दोघांनीही निळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने अनेक नेटकऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी दोघांच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित केले, तर काही चाहत्यांनी या कथित जोडीला शुभेच्छाही दिल्या.

मात्र अर्जुन कपूर आणि साहिबा बाली या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत किंवा डेटिंगच्या चर्चांबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही लॉर्ड्सवरील त्यांची एकत्र उपस्थिती आणि त्यानंतर व्हायरल झालेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा प्रमुख विषय ठरले आहेत.

News Title: Arjun Kapoor Dating Rumours Grow

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now