Salman Aishwarya Relationship l बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं नातं म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं. 90 च्या दशकात हे जोडपं प्रेक्षकांचं लाडकं होतं. मात्र त्यांचं ब्रेकअप जेवढं गाजलं, तेवढंच त्यामागचं कारणही अनेक वर्षं गुलदस्त्यात होतं. आता अभिनेता अरबाज खान याने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
अरबाज खानच्या म्हणण्यानुसार, ऐश्वर्यामुळे सलमानच्या वागणुकीत अनेक बदल झाले होते. तो कधी-कधी इतका रागावायचा की घरात तोडफोडही करायचा. ऐश्वर्या घरी येऊन कुटुंबासोबत वेळ घालवायची, पण लग्नाचा विषय निघाला की टाळाटाळ करायची. याच गोष्टींमुळे सलमान मानसिकदृष्ट्या त्रस्त होता, असं अरबाजने सांगितलं.
सलमानचं प्रेम, पण ऐश्वर्याची अनास्था? :
सलमानला ऐश्वर्यासोबत लग्न करायचं होतं, पण ती तयार नव्हती, हे स्पष्ट करताना अरबाज म्हणतो, “लग्नाच्या विषयावर दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. ऐश्वर्या टाळाटाळ करायची आणि भाईजान मात्र अधिकच त्रासलेला असायचा.” या सर्व वादामुळेच त्यांच्या नात्याचा शेवट झाला, असंही त्याने स्पष्ट केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या वडिलांनाही सलमान आवडत नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलीचं सलमानसोबत भविष्य नाही, असं स्पष्ट सांगितलं होतं. या वादामुळे पोलिसांतही तक्रारी झाल्याचं रिपोर्ट्समध्ये नमूद आहे.
Salman Aishwarya Relationship l ब्रेकअपनंतर ऐश्वर्याच्या आयुष्यातील वळणं :
सलमानपासून वेगळं झाल्यानंतर ऐश्वर्याचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं. काही काळ दोघं रिलेशनशिपमध्ये होते, मात्र हे नातंही जास्त काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात अभिषेक बच्चनची एन्ट्री झाली.
2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न पार पडलं. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी लेक आराध्याचं स्वागत केलं. सध्या ऐश्वर्या वैवाहिक आयुष्यात समाधानी असून, अनेकदा तिला आराध्यासोबत कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतं. सोशल मीडियावरही ती आराध्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.








