BE/B.Tech असाल तर ही संधी खास तुमच्यासाठी! जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

On: April 12, 2025 8:53 AM
APSC Recruitment 2025
---Advertisement---

APSC Recruitment 2025 |  सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आसाम लोकसेवा आयोगाने सहाय्यक अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून एकूण 45 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती आसाममधील जलसंपदा विभागात करण्यात येणार असून पात्र उमेदवार 15 एप्रिल 2025 पासून अर्ज दाखल करू शकतील. (APSC Recruitment 2025)

अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 मे 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी http://apsc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी एक चांगली संधी ठरू शकते.

पात्रतेचे निकष 

या भरतीअंतर्गत जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी 45 उमेदवारांची निवड होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी.

वयाच्या अटींनुसार, अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 38 वर्षांपर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराने आपली पात्रता नीट तपासूनच अर्ज करावा.

अर्ज फी  

अर्ज करताना उमेदवारांनी निश्चित अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही फी 297.40 रुपये आहे. OBC/MOBC आणि SC/ST/BPL/PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अनुक्रमे 197.40 रुपये आणि 47.20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून अर्जपत्रक काळजीपूर्वक भरावे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व दस्तऐवज तयार ठेवूनच अर्ज करण्याची शिफारस केली जाते.

एक महिन्याची भरती प्रक्रिया 

ही भरती प्रक्रिया 15 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असून 14 मे 2025 ही अंतिम मुदत असेल. त्यामुळे उमेदवारांकडे एक महिन्याचा कालावधी अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून तयारीला लागावे.

सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक नामी संधी असून, पात्र उमेदवारांनी संधीचा फायदा घ्यावा. योग्य शैक्षणिक पात्रता आणि वयोगटात येणारे सर्वजण या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. सरकारी नोकरीत स्थैर्य आणि विविध सुविधा मिळत असल्यामुळे उमेदवारांची या भरतीकडे विशेष उत्सुकता आहे.

Title: APSC Recruitment 2025 Apply Online from April 15

 

 

Join WhatsApp Group

Join Now