आयफोनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; iPhone SE 4 बाबत महत्त्वाची अपडेट समोर

On: February 14, 2025 3:11 PM
Apple iPhone SE 4 Launching Soon 
---Advertisement---

Apple iPhone | आयफोन (iPhone) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ॲपलचा (Apple) सर्वात स्वस्त फोन, iPhone SE 4, लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. ॲपलचे (Apple iPhone) CEO टिम कूक (Tim Cook) यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

लॉन्च तारीख आणि तपशील

टिम कूक (Tim Cook) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टनुसार, 19 फेब्रुवारीला ॲपल (Apple) एक नवीन डिव्हाइस सादर करणार आहे. iPhone SE 4 लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टिम कूक (Tim Cook) यांनी टीझरमध्ये लॉन्चिंगची वेळ नमूद केलेली नाही, त्यामुळे कंपनी हे डिव्हाइस सॉफ्ट लॉन्चद्वारे सादर करू शकते, अशी चर्चा आहे. 19 फेब्रुवारीला ॲपल (Apple) कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याचे, टिम कूक (Tim Cook) यांनी ॲपलच्या (Apple) लोगो असलेल्या टीझरमध्ये म्हटले आहे.

आयफोन (iPhone) SE सिरीजचा इतिहास

ॲपलने (Apple) पहिला iPhone SE 2016 मध्ये लॉन्च केला होता. त्यानंतर iPhone SE 2 आणि iPhone SE 3 देखील सादर केले. आता कंपनी चौथ्या जनरेशनमधील iPhone SE 4 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, iPhone SE 4 फेब्रुवारीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

संभाव्य वैशिष्ट्ये आणि किंमत

नवीन SE सिरीजच्या आयफोनमध्ये (iPhone) अनेक सुधारित वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. होम बटण नसलेला हा SE मालिकेतील पहिला आयफोन (iPhone) असू शकतो. तसेच, याची रचना जुन्या SE आयफोनपेक्षा (iPhone) वेगळी असू शकते. हा फोन iPhone 16e नावाने देखील लॉन्च होऊ शकतो. यात फेस आयडी, USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 6.06 इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. A18 चिपसेटसह 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB ते 512 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. मागील बाजूस 48MP आणि समोर 24MP कॅमेरा असू शकतो. iPhone SE 3 ची किंमत 43,000 रुपये होती, तर iPhone SE 4 ची किंमत 49,900 रुपयांच्या आसपास असू शकते, असा अंदाज आहे. (Apple iPhone)

Title : Apple iPhone SE 4 Launching Soon 

 

Join WhatsApp Group

Join Now