Apple लवकरच लॉन्च करणार फोल्डेबल iPhone, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

On: March 7, 2025 12:13 PM
Apple Foldable iPhone Launch date and Price
---Advertisement---

Foldable iPhone | Apple लवकरच आपल्या पहिल्या फोल्डेबल iPhone वर काम करत आहे. नव्या अहवालांनुसार, हा फोल्डेबल iPhone 2026 मध्ये लॉन्च होईल. याआधी असा अंदाज लावला जात होता की तो क्लॅमशेल डिझाइनमध्ये येईल, मात्र आता असे सांगितले जात आहे की हा iPhone बुक-स्टाइल फोल्डिंग डिझाइनमध्ये असेल. (Foldable iPhone)

Apple च्या फोल्डेबल iPhone चे संभाव्य फीचर्स

प्रसिद्ध अॅनालिस्ट मिंग-ची कुओ (Ming Chi-Kuo) यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे या फोल्डेबल iPhone विषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या डिव्हाइसची मुख्य डिस्प्ले 7.8 इंच तर बाहेरील डिस्प्ले 5.5 इंच असणार आहे. डिस्प्लेवर फोल्डिंग लाईन कमी दिसेल.

  • हा फोल्डेबल iPhone फोल्ड केल्यावर 9mm ते 9.5mm जाड आणि अनफोल्ड केल्यावर 4.5mm ते 4.8mm इतका पातळ असेल.
  • फोनचे केसिंग टायटॅनियम अलॉयपासून बनवले जाईल, जे डिव्हाइसला अधिक मजबूत करेल.
  • या फोनच्या हिंजमध्ये स्टेनलेस स्टील आणि टायटॅनियम अलॉयचा वापर केला जाईल.
  • Apple या फोनमध्ये फेस आयडी काढून टच आयडी साइड माउंटेड स्वरूपात देऊ शकतो.
  • फोल्डेबल iPhone मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, तसेच फोल्ड आणि अनफोल्ड दोन्ही अवस्थेत फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे.
  • Apple या iPhone मध्ये उच्च घनतेच्या बॅटरी सेलचा वापर करेल, जो iPhone 17 मध्ये देखील दिसू शकतो.
  • यात AI आधारित फीचर्स, क्रॉस-ऍप इंटिग्रेशन आणि इतर अनेक स्मार्ट टेक्नोलॉजी मिळणार आहेत.

Apple च्या फोल्डेबल iPhone ची संभाव्य किंमत

Apple या फोल्डेबल iPhone ला प्रीमियम कॅटेगरीमध्ये ठेवणार आहे. या फोनची संभाव्य किंमत 2,000 डॉलर (सुमारे 1.74 लाख रुपये) असू शकते. मात्र, अंतिम स्पेसिफिकेशन्स 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत निश्चित केल्या जातील, तर 2026 च्या अखेरीस या फोनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होईल. तसेच, या स्मार्टफोनची दुसरी जनरेशन 2027 मध्ये येण्याची शक्यता आहे.

Title : Apple Foldable iPhone Launch date and Price

 

Join WhatsApp Group

Join Now